Civil Services Exam : राज्‍यसेवा मुख्य परीक्षेचा आज अखेरचा दिवस

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आयोजित राज्‍यसेवा मुख्य परीक्षा २०२३ ला दुसऱ्या दिवशी दांडीबहाद्दरांमध्ये आणखी एकाची भर पडली.
Civil Services Exam
Civil Services Examesakal
Updated on

Civil Services Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आयोजित राज्‍यसेवा मुख्य परीक्षा २०२३ ला दुसऱ्या दिवशी दांडीबहाद्दरांमध्ये आणखी एकाची भर पडली. एकूण ३२ उमेदवार परीक्षेस गैरहजर राहिले तर ३१६ उमेदवारांनी परीक्षा दिली.

राज्‍यसेवा मुख्य परीक्षेला शनिवार (ता.२०) पासून सुरवात झाली आहे. (Today is last day of civil services main exam nashik news)

नाशिकमध्ये सारडा कन्‍या विद्यालय या एकमेव केंद्रावर ही परीक्षा होते आहे. तीन दिवसीय परीक्षेच्‍या पहिल्‍या दिवशी ३१ उमेदवार गैरहजर होते. तर दुसऱ्या दिवशी त्‍यात आणखी एकाची भर पडल्याने एकूण ३२ उमेदवार गैरहजर राहिले.

Civil Services Exam
Nashik Civil Hospital: औषध पुरवठादाराला केले ‘ब्लॅक लिस्ट’! जिल्हा शल्यचिकित्सकांचा दणका

रविवारी जीएस-१ आणि जीएस-२ असे दोन पेपर दोन सत्रांमध्ये झाले. प्रत्‍येकी दीडशे गुणांच्‍या पेपरसाठी दोन तासांची वेळ होता. इतिहास, भूगोल, राज्‍यशास्‍त्र अशा विविध विषयांवर आधारित या पेपरची काठिण्यपातळी मध्यम स्वरूपाची राहिल्‍याचे परीक्षार्थ्यांनी सांगितले.

दरम्‍यान सोमवारी (ता.२२) या परीक्षेचा अंतिम दिवस असून यानंतर एमपीएससीतर्फे पात्रताधारक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविले जाईल. लेखी परीक्षा आणि मुलाखतीचे गुण अशी कामगिरी लक्षात घेत एकत्रितरीत्या निकाल जाहीर होणार आहे.

Civil Services Exam
National Civil Services Day : सिव्हील सर्व्हिसेसमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचा पगार अन् मिळणाऱ्या सुविधा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.