token machine
token machineesakal

नाशिक : मजुर टंचाईवर मात करण्यासाठी टोकन यंत्राची मदत

Published on

झोडगे (जि. नाशिक) : विहिरीच्या (wells) उपलब्ध पाणीसाठ्यावर ठिबकद्वारे टोकण यंत्राच्या (Token Machine) सहाय्याने भिलकोट येथील महिला शेतकरी वंदना लुभान निकम यांची कपाशी लागवड परिसरात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. टोकण यंत्राच्या सहाय्याने कपाशीसह (Cotton) इतर पिकांच्या लागवडीसाठी उपयुक्त असून, तीन ते चार मजुरांचे (Labours) काम एकच मजूर करीत असल्याने मजुरी खर्च व वेळेची बचत होत आहे. (Token machine help to overcome labor shortage Nashik News)

कपाशीसह इतर पिकांच्या लागवडीसाठी मजुरांना बीज टोपण करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते. अशावेळी कंबर व गुडघेदुखीचा त्रास होत असल्याने महिला मजुरांच्या काम गतीवर परीणाम होताना दिसतो. तर हाताने लागवड करताना बियाण्यांची नासाडी व कमी- जास्त खोलीवर बिज लागवडीमुळे उत्पादनावर परीणाम होतो. अशावेळी टोकण यंत्राच्या सहाय्याने एकसारख्या खोलीवर बीजारोपण होत असल्याने उगवण क्षमता चांगली असते. यंत्रामध्ये दोन किलो बियाणे भरण्याची सुविधा असल्याने वारंवार बियाणे हाताळावे लागत नसल्याने नुकसान होत नाही. मजूर टंचाईवर मात करण्यासाठी प्रभावी उपाय म्हणून टोकन यंत्राला शेतकऱ्यांची पसंती दिसून येते.

token machine
Nashik : प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचा लाभ घ्यावा

"टोकण यंत्राच्या सहाय्याने खूप चांगल्या पद्धतीने, बियाणे एक किंवा दोन टोकाचे असतील तर यंत्राच्या सहाय्याने लागवड करता येते. म्हणून बियाण्याचे नुकसान होत नाही. टोकण यंत्राच्या सहाय्याने लागवड केलेल्या बियाण्याची उगवणशक्ती चांगली होते. या यंत्राची किंमत २००० ते २२०० रूपये असून, लागवडीची समस्या दुर होते." - वंदना निकम, शेतकरी, भिलकोट

token machine
Nashik : ओतुरची ऐतिहासिक बारव पुनर्वैभवाच्या प्रतीक्षेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()