Nashik News : सिन्नर-शिर्डी महामार्गावर पिंपरवाडी येथील टोल प्लाझा कार्यान्वित

Toll plaza at Pimpalwadi on Sinnar Shirdi highway is Executed
Toll plaza at Pimpalwadi on Sinnar Shirdi highway is Executedesakal
Updated on

सिन्नर (जि. नाशिक): मुंबई व नाशिक मार्गे शिर्डीला येणाऱ्या साईभक्तांचा प्रवास अधिक वेगवान बनवण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून बनवण्यात आलेला सिन्नर ते सावळी विहीरफाटा दरम्यान पन्नास किलोमीटर अंतराचा चौपदरी रस्ता पूर्णत्वाकडे आला आहे. (Toll plaza at Pimpalwadi on Sinnar Shirdi highway is Executed nashik news)

या प्रकल्पाचे 85% पर्यंतचे काम पूर्ण झाल्यानंतर एक एप्रिल पासून या मार्गावर वावी जवळच्या पिंपरवाडी येथील टोल प्लाझा सुरू करण्यात आला आहे. पुढचे दोन दिवस तांत्रिक परीक्षण झाल्यानंतर टोलनाका पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे.

नाशिक-पुणे महामार्गावरील गुरेवाडी फाटा येथून मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील नीलकमल कंपनीपर्यंत बायपास बनवण्यात आला असून तेथून पुढे शिर्डी पर्यंतचा पूर्वीचा रस्ता चौपदरी करण्यात आला आहे. या रस्त्याला लगत 40 किलोमीटर अंतराचा स्वतंत्र पालखी मार्ग बनवण्यात आला असून हा मार्ग प्राधान्याने पदयात्री वापरतील.

मुसळगाव वसाहत, शहापूर, पांगरी व वावी या गावांमध्ये रहदारीला अडथळा येऊ नये म्हणून उड्डाणपूल साकारण्यात आले आहेत. तर पाथरे येथे स्काय वॉक बनवण्यात आला आहे. नाविन्यपूर्ण पद्धतीने हायब्रीड ॲन्युटी मॉडेल्स (हॅम) तत्त्वावर हा महामार्ग बांधण्यात आला असून प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आल्याचे न्हाईकडून सांगण्यात आले.

या प्रकल्पाचे नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास 85 टक्के काम पूर्ण झाले असून पथकर आकारणीसाठी सिन्नर तालुक्यातील पिंपळवाडी येथे टोल प्लाजा उभारण्यात आला आहे नवीन आर्थिक वर्षात एक एप्रिल पासून या ठिकाणी टोल आकारणी वसूल केली जाईल असे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Toll plaza at Pimpalwadi on Sinnar Shirdi highway is Executed
Nashik News : ज्योती जाधवची पुन्हा एकदा चमकदार कामगिरी; राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रासाठी ब्रांझ

या टोलनाक्यावरील जाणाऱ्या व येणाऱ्या सर्वच लेन डिजिटल असणार आहेत केवळ 'फास्टॅग'द्वारे येथे वाहनांकडून टोल जमा केला जाईल. जाणाऱ्या व येणाऱ्या मार्गीकेवर केवळ एकच लाईन हायब्रीड असणार असून याच लाईनवर रोखीने टोल आकारणी होईल. केंद्र सरकारच्या परिपत्रकानुसार राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवर फेब्रुवारी 2021पासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या वाहनधारकांनी फास्टॅग लावलेले नसतील अशा वाहनांना त्यांच्या श्रेणीसाठी लागू असलेल्या फीच्या दोन पट समतुल्य फी टोल नाक्यावर रोखीने भरावी लागणार आहे.

असे आहेत टोलचे दर...

कार/जीप/व्हॅन/एलएमव्ही प्रकारातील वाहनासाठी 75रुपये एकेरी फेरी तर एकाच दिवसातील दुहेरी फेरीसाठी 115रुपये आकारणी केली जाईल. एसएलव्ही/एलजीव्ही/ मिनीबस वाहनासाठी 125रुपये, बस/ट्रककरिता 260रुपये, 3 एक्सल कमर्शियल वाहनासाठी 285रुपये, चार ते सहा एक्सल वाहनांसाठी 410रुपये, सात किंवा अधिक एक्सलच्या अवजड वाहनासाठी 500रुपये असे एकेरी फेरीचे शुल्क असणार आहे.

स्थानिकांना आवाहन..

टोल प्लाजाच्या 20 किलोमीटर अंतरापर्यंतच्या परिसरात राहणाऱ्या अव्यावसायिक स्थानिकांच्या वाहनांसाठी 2023-24 या वर्षासाठी मासिक पासचे दर 330 रुपये इतके ठेवण्यात आले आहेत. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी स्थानिक वाहनधारकांनी आवश्यक (गाडीचे नोंदणी प्रमाणपत्र पुस्तिका,आधारकार्ड) कागदपत्रे टोल प्लाझा कार्यालयात सादर करून आपली गाडी स्थानिक श्रेणीमध्ये नोंदणी करून घ्यावी. स्थानिकांना टोल फी सवलत केवळ 'फास्टॅग'द्वारेच उपलब्ध असणार आहे.

Toll plaza at Pimpalwadi on Sinnar Shirdi highway is Executed
Ram Navami 2023 : कुष्ठपीडितांच्या वसाहतीत रंगला श्रीराम जन्मोत्सव; ढोल ताशांच्या गजरात पालखी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.