Tomato Rates Hike: टोमॅटोची लाली सप्टेंबर अखेरपर्यंत टिकणार! जिल्ह्यातील लागवडीचे क्षेत्र निम्म्याने घटले

tomato
tomato esakal
Updated on

Tomato Rates Hike : आगाप लागवड केलेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या आयुष्यात यंदा लालक्रांती घडली. न भुतो..., असा सरासरी दोन हजार रुपये प्रतिक्रेट्‌स असा सर्वकालीन विक्रम मोडणारा बाजारभाव टोमॅटो खात आहे.

टोमॅटोच्या दराला ऐतिहासिक लाली चढण्याचे कारण म्हणजे पावसाअभावी जिल्ह्यातील लागवडीचे क्षेत्र निम्म्याने घटले आहे. त्यात पाच लाख क्रेट्‌सची परराज्यातून मागणी असताना, जिल्ह्यातून अवघे एक ते दीड लाख क्रेट्‌सचा पुरवठा होतो.

आवकेत पुढील दीड महिना फारशी सुधारणा होण्याची चिन्ह नाहीत. त्यामुळे टोमॅटोच्या दराची लाली सप्टेंबर अखेरपर्यंत टिकू शकते, अशा अंदाज टोमॅटो शेती सल्लागार सुनील दिंडे यांनी वर्तविला आहे. (tomato rates hike last till end of September Cultivated area in district decreased by half nashik)

गेल्या दोन-तीन वर्षांपासून कोणत्याच शेतीमालाला बाजारभाव नसल्याने शेतकरी वैफल्यग्रस्त होते. नेहमीच बेभरवशाचे पीक असलेल्या टोमॅटोने त्यांच्या या निराशेला दूर सारत आशेचा किरण दाखविला आहे.

नाशिक जिल्ह्यात सरासरी टोमॅटो लागवड ४० हजार एकरवर होत असते, पण पावसाने टोमॅटोचे उत्पादन घेणाऱ्या सिन्नर, येवला, चांदवड, निफाड परिसरात दडी मारली. त्यामुळे २० मेदरम्यान होणारी लागवड अवघी २१ हजार एकरवर झाली आहे.

त्यातच प्रतिकूल हवामानामुळे व्हायरस, नागअळी, फुलगळ, अशी रोगांचे आक्रमण झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली. नाशिक जिल्ह्यातील ही अवस्था असताना, कोल्हार-बंगळुरु, संगमनेर येथील टोमॅटोवर सततच्या पावसामुळे पाणी फिरले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

tomato
Tomato Rates Hike: टोमॅटोने बनविले चक्क करोडपती, लखपती! डोंगरकुशीत वसलेल्या धुळवडकरांचे कष्ट

मागणी पाच लाख, पण पुरवठा दीड लाख

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड येथील टोमॅटोचे पीक पावसाने कहर केल्याने भुईसपाट झाले. बंगळुरु, नारायणगाव येथील हंगामावर पडदा पडल्याने परराज्यात टोमॅटो पुरवठा करण्याची सर्व भिस्त नाशिक जिल्ह्यावर आहे, पण उत्पादन निम्मेच आहे.

शिवाय दिल्ली, पंजाब, हरियाणा, बंगाल यासह परराज्यातून पाच लाख क्रेट्‌सची मागणी आहे. पुरवठा दीड लाख क्रेट्‌स होत आहे. निफाड, येवला येथील टोमॅटो आता काढणीला सुरवात झाली आहे.

त्यामुळे पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त, हे समीकरण पुढील दोन महिने कायम राहण्याची चिन्हे आहेत. पिंपळगाव बसवंत, लासलगाव, नाशिक येथील बाजार समित्यांमध्ये १५ ऑगस्टनंतर आवक वाढली तर दर प्रतिक्रट्‌सट १२०० रुपये दर राहण्याचे भाकित वर्तविले जात आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात जुगारी पीक म्हणून हिणविल्या जाणारा टोमॅटो समृध्दी आणू शकतो, ही संधी ओळखून पन्हाळे (ता. चांदवड) येथील शेतकरी किरण आवारे यांनी ट्रँकरने टोमॅटोला पाणी दिले.

काही ठिकाणी पिकाला सुरक्षा म्हणून सीसीटिव्ही कॅमेरे लावले आहेत. खाण्यासह केचअप बनविण्यासाठी टोमॅटोचा वापर वाढला आहे.

"यंदा टोमॅटोच्या क्षेत्रात पावसाअभावी निम्याने घट झाली आहे. प्रतिकूल वातावरणामुळे नागअळी, फुलगळ होत आहे. कीटकनाशक, बुरशीनाशकांची फवारणी यासाठी सूचवित आहे. इतर बाजारपेठतील हंगाम संपल्याने नाशिक जिल्ह्यातील टोमॅटोला सप्टेंबर अखेरपर्यंत दरात तेजी मिळू शकते." -सुनील दिंडे, टोमॅटो शेती सल्लागार

tomato
Tomato : चाळीस गुंठ्यांत शेतकऱ्याला लाखोंचे उत्पन्न; टोमॅटोला मध्यप्रदेशात मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.