आठवडे बाजारात टोमॅटो, कोथिंबीर @ ८०; सर्वच भाज्यांच्या दरांत तेजी

vegetables
vegetablesesakal
Updated on

पंचवटी (जि. नाशिक) : बुधवारच्या आठवडे बाजारात (Weekly Bazar) सर्वच भाज्यांच्या (vegetables) दरांत तेजी अनुभवण्यास मिळाली. उन्हाच्या (Heat) तडाख्याने आवक मंदावल्याने किलोभर टोमॅटोसाठी (Tomato) चक्क ऐंशी रुपये मोजावे लागत होते. उन्हाच्या वाढत्या तडाख्याने आठवडे बाजारात भाज्यांच्या दरांत मोठी वाढ झाल्याने महागाईने अगोदरच हैराण झालेल्या महिलांचे आर्थिक बजेट साफ कोसळले आहे. बाजारात मेथी (Fenugreek), कोथिंबीरची (coriander) आवक घटल्याने दरांत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे महिलांची पसंती कोबी, फ्लॉवर, वांगी यांना राहिली. (Tomatoes coriander 80 rs in weekly market Rising prices of all vegetables Nashik News)

दर पुढीलप्रमाणे

भाजीपाला प्रति किलो दर

१. टोमॅटो ८० रुपये.

२. गवार ८० ते १००

३. शेवगा ८० रू. किलो

४. कारले ८० रू. किलो

५. मेथी ४० जुडी

६. कोथिंबीर ४० ते ५०

७. वांगी ४० रू. किलो

८. हिरवी मिरची ८० रू. किलो

९. कोबी/ फ्लॉवर १० रू. गड्डा

vegetables
राज्यसभा निवडणुकीसाठी जोरदार रस्सीखेच; MIMच्या भूमिकेबाबत उत्सुकता

चोरट्यांची नदीपात्रातून धूम

आठवडे बाजार अन् भुरटे चोरटे यांचे हे जणू गेल्या काही वर्षातील समीकरणच बनले आहे. आजही एका ज्येष्ठ महिलेचा मोबाईल हातोहात लांबविण्यात आल्यावर तिने भाज्यांची खरेदी सोडून थेट घर गाठणेच पसंत केले. या आठवडे बाजारात दहा ते बारा चोरटे नेहमीच सक्रिय असतात. त्यापासून सावधान राहण्याचा इशारा अनेक विक्रेतेच खरेदीदारांना त्यांच्या अनुभवावरून देतात. मध्यंतरी एका चोरट्याला पकडून नागरिकांनी मारहाण केली असता, त्याने थेट गोदापात्रात उडी घेत पलीकडचा किनारा गाठत धूम ठोकली.

vegetables
Malgegaon : महापालिकेवर 13 जूनपासून आयुक्तांची प्रशासकपदी नियुक्ती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.