Nashik Tomato Rates Fall : अडीच हजार रुपये क्रेट, असा सर्वकालीन उच्चांकी दर पंधरा दिवसांपूर्वी टोमॅटोच्या २० किलोच्या क्रेट्सला मिळत होता. हाच दर आता ६०० ते ७०० रुपये क्रेटपर्यंत गडगडला आहे.
वाढलेल्या आवकेने बाजारभावातील तेजी व टोमॅटोची लाली ओसरली आहे. बाजारभावाबाबत बेभरवशाचे व जुगारी पीक, असे टोमॅटोबाबत पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
बाजारभाव कोसळल्याने मोठ्या अपेक्षेने टोमॅटोची लागवड केलेल्या शेतकऱ्यांची पदरी निशारा येण्याची चिन्हे आहेत. (tomatoes Market prices fell by 2 thousand compared to 15 days nashik)
पिंपळगाव बाजार समितीच्या टोमॅटोच्या हंगामाची ऐतिहासीक उंचीच्या दराने सुरवात झाली. सुमारे दोन ते अडीच हजार रुपये प्रतिक्रेट्स असा दर १५ दिवसांपूर्वी टिकून होता, पण केंद्र शासनाने नेपाळमधून टोमॅटो आयातीचे स्वीकारलेले धोरण बाजारभाव कोसळण्याला पुरेसे ठरले.
ही घसरण थांबविण्याचे नाव घेताना दिसत नाही. बंगळुरुच्या कोल्हार, चिंतामणी व सोलापूर, लातूर येथे १५ लाख क्रेटपर्यंत आवक होत आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
शिवाय पिंपळगाव बसवंत बाजार समितीतही दररोज ३५ हजार क्रेट्स, तर नाशिक जिल्ह्यात एकूण दोन लाख क्रेट्सची आवक होऊ लागली आहे.
पिंपळगाव बाजार समितीत ६०० रुपये प्रतिक्रेट दर
वाढलेल्या आवकेचा दरावर दबाव आला आहे. पिंपळगाव बाजार समितीत सरासरी ६०० रुपये प्रतिक्रेट्सने टोमॅटोची विक्री झाली.
सध्या मागणी व पुरवठ्याचे समीकरण योग्य असल्याने दरातील तेजी ओसरल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. उत्तर प्रदेश, दिल्ली येथून टोमॅटोला मागणी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.