Nashik : प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांचा उद्या दीक्षांत सोहळा

Convocation ceremony at maharshtra Police Academy tomorrow Nashik News
Convocation ceremony at maharshtra Police Academy tomorrow Nashik Newsesakal
Updated on

नाशिक : येथील त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमीतील (Maharashtra Police Academy) १२१ व्या प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांच्या (trainee police sub inspector) तुकडीचा दीक्षांत सोहळा (Convocation ceremony) शुक्रवारी (ता. १७) होत आहे. या तुकडीतील १६० पुरुष व ११ महिला असे १७१ पोलिस उपनिरीक्षक राज्याच्या पोलिस दलामध्ये समाविष्ट होणार आहेत. (tomorrow Convocation ceremony of trainee police sub inspector on maharashtra police Academy Nashik News)

महाराष्ट्र पोलिस अकादमीतील कवायत मैदानावर दीक्षांत सोहळ्याला सकाळी ८ वाजता प्रारंभ होईल. यावेळी राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ, अपर पोलिस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) संजय कुमार यांची प्रमुख उपस्थिती असेल. प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांची संचलन परेडनंतर पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते होईल.

Convocation ceremony at maharshtra Police Academy tomorrow Nashik News
‘त्याने' कुटुंबीयांना घडविले पालखीचे लाइव्ह दर्शन

दरम्यान, अकादमीतील ही १२१ वी तुकडी असून, या तुकडीमध्ये १७१ पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. यामध्ये १६० पुरुष व ११ महिला प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक आहेत. तसेच यातील ६८ टक्के प्रशिक्षणार्थी हे पदवीधर व पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केलेले आहेत. गेल्या दहा महिन्यात या प्रशिक्षणार्थींना भारतीय दंड संहिता, फौजदारी दंड संहिता, विशेष कायदे, सायबर क्राईम, फॉरेन्सिक सायन्स, गुन्हेगारी शास्त्र, कवायत, गोळीबार, शस्त्र कवायत, शारीरिक प्रशिक्षण, योगा आदींचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. यातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थींना विविध पुरस्कारांना यावेळी गौरविले जाणार आहे.

Convocation ceremony at maharshtra Police Academy tomorrow Nashik News
Nashik : राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त पेट्रोलवर 54 रुपयांची सूट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.