Nashik News : वातावरणीय जोखमीचे विश्लेषण व शहरातील हरितगृह वायू उत्सर्जनचे स्रोत ओळखण्याच्या उद्देशाने महापालिकेकडून शहराचा पहिला वातावरण बदल कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
त्याचे प्रकाशन ९ फेब्रुवारीला महापालिका आयुक्त तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. (Tomorrow release of first climate change plan nashik news)
राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली व वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (डब्ल्यूआरआय) संस्थेच्या तांत्रिक मदतीने महापालिकेने शहरासाठी पहिलाच विस्तृत वातावरण बदल कृती आराखडा तयार केला आहे. शहरातील वातावरणातील बदल कृती आराखडा हा आंतरराष्ट्रीय मानके संरचना आणि पद्धतींवर आधारित आहे.
२०२२ मध्ये आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. महापालिकेचे विविध विभाग व संस्थांकडून या संबंधित माहिती संकलित करण्यात आली. त्यानंतर त्याचे विस्तृत विश्लेषण व अभ्यास करण्यात आला.
महापालिकेचे प्रमुख विभाग व इतर संबंधित संस्थांनी व्यापक सल्ला मसलत करून आराखडा तयार केला आहे. वातावरणातील जोखमीचे विश्लेषण व शहरातील हरितगृह वायू उत्सर्जनचे स्रोत ओळखणे हे आराखड्याचे पहिले उद्दिष्ट होते.
या समस्यांचा सामना करण्यासाठी केले जाणारे क्षेत्रनिहाय लक्ष धोरणे व कृतीची रूपरेषा आराखड्यात समावेश करण्यात आली आहे. नाशिक शहरातील वातावरणीय बदल कृती आराखडा उपयुक्त ठरेल, अशी माहिती पर्यावरण विभागाचे उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.