Nashik News : साल्हेर किल्ल्यावर पर्यटकांची फसवणूक; वेगवेगळ्या पावत्या देत होतेय आर्थिक लूट!

Various receipts issued to tourists by the Joint Forest Management Committee at the fort.
Various receipts issued to tourists by the Joint Forest Management Committee at the fort.esakal
Updated on

कळवण (जि. नाशिक) : साल्हेर किल्ल्यावर (ता. सटाणा) पर्यटक यांची संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडून बनावट पावत्या देत आर्थिक लूट होत असल्याचा आरोप ॲड. विनायक पगार यांनी करत यासंदर्भात वनविभागाकडे लेखी तक्रार केली आहे. (Tourists cheated at Salher Fort Giving different receipts financial loot Nashik News)

कळवण येथील शिवप्रेमी साल्हेर किल्ला पाहण्यासाठी गेले असता वनपरिक्षेत्र ताहाराबाद यांच्या अंतर्गत संयुक्त वन व्यवस्थापन समिती कडून त्यांना किल्ल्यावर जाण्यासाठी प्रतिव्यक्ती १०० रुपये शुल्क आकारले. मात्र यानंतर त्यांना वेगवेगळ्या दोन पावत्या दिल्या. तसेच या पावत्यांवर कुठल्याही प्रकारचा शिक्का नव्हता.

तसेच सदरील पावती ही कायदेशीर आकारणी केलेल्या प्रवेश पावतीच्या बनावट असल्याचे उघड झाले. त्यामुळे याठिकाणी पर्यटक आणि गडप्रेमींकडून सर्रास पैसे उकळले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.

त्यामुळे वनविभागाने तत्काळ या प्रकरणाची चौकशी करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी ॲड. पगार यांनी केली.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Various receipts issued to tourists by the Joint Forest Management Committee at the fort.
Nashik ZP News : मंजूर 242 कोटी अन् नियोजन 260 कोटींचे!

ना दिशादर्शन ना सुविधा

संयुक्त वनव्यवस्थापन समितीने या भागात येणाऱ्या पर्यटक यांना सुविधा देणे गरजेचे आहे. परंतु किल्ल्यावर जाण्याकरिता कुठे ही दिशादर्शक फलक, पारंपरिक मार्ग, प्राचीन मार्ग, फलक लावण्यात आलेले नाही. किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची तसेच स्वच्छतागृह देखील नाही.

"किल्ल्यावर संयुक्त वन व्यवस्थापन समितीतर्फे खोट्या पावत्या छापून पर्यटक व शिवप्रेमी यांची लूट केली जात आहे. या प्रकरणी समितीच्या अध्यक्ष यांच्याकडे विचारणा केली असता त्यांना पावत्या दाखवून देखील काहीच कारवाई केली नाही." - ॲड. विनायक पगार, कळवण

Various receipts issued to tourists by the Joint Forest Management Committee at the fort.
Nashik News : जीपीओ रस्त्याने टाकली कात; तब्बल 2 वर्षानंतर रस्ता झाला खड्डेमुक्त!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()