Nashik Bees Attack: शीतकडा धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; भीतीदायक Video

Nashik Trekking group Attacked by Bees video: व्हिडिओमध्ये दिसतंय की, जवळपास १० ते १५ जणांच्या गिर्यारोहकांच्या ग्रुपवर मशमाशांनी हल्ला केला आहे. गिर्यारोहक आपले तोंड झाकून जमिनीवर पडले आहेत.
Attacked by Bees
Attacked by Bees
Updated on

Nashik News Attacked by Bees: नाशिकच्या हरिहरगड परिसरातील प्रसिद्ध शीतकडा धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला गेल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारची ही घटना आहे. यात काही गिर्यारोहक जखमी झाले आहेत. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये दिसतंय की, जवळपास १० ते १५ जणांच्या गिर्यारोहकांच्या ग्रुपवर मशमाशांनी हल्ला केला आहे. गिर्यारोहक आपले तोंड झाकून जमिनीवर पडले आहेत. सदर व्हिडिओ भीतीदायक आहे. सुदैवाने मधमाशांच्या या हल्ल्यात कुणाला गंभीर दुखापत झाली नाही. 'साम टीव्ही'ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

Attacked by Bees
Viral Video | पिलाला वाचविण्यासाठी अस्वल भिडले वाघाशी,व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील घटना

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकहून हिमऑरडील या ट्रेकिंग संस्थेतर्फे काही पर्यटक हरीहर गड परिसरातील शीतकडा धबधबा पाहण्यासाठी गेले होते. यावेळी दुपारी १२ च्या सुमारास मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पर्यटक हादरले होते. मात्र, ट्रेक लिडरच्या अनुभवामुळे पर्यटकांवरील मोठा धोका टळला असं सांगितलं जातं.

Attacked by Bees
Viral Video: फेमस होण्यासाठी इंदौरच्या चौपाटीवर अर्धनग्न अवस्थेत फिरू लागली तरुणी; भाजप नेत्याने फटकारताच पोस्ट केला आणखी एक व्हिडिओ

मधमाशांचा हल्ला होताच ट्रेक लिडरने सर्वांना जमिनीवर झोपण्याचा सल्ला दिला. जमिनीवर झोपा आणि कोणतीही हालचाल करू नका अशा सर्वांना सूचना देण्यात आल्या होत्या. पर्यटकांनी या सूचनांचे तंतोतंत पालन केल्यामुळे मोठी हानी टळली आहे.

चार पर्यटकांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. जवळपास २० ते २५ मिनिटे मधमाशा पर्यटकांच्या डोक्यावर घोंघावत होते. काही पर्यटकांनी वेखंडाचे पावडर आणले होते. त्याचा वापर केल्याने मधमाशा पळून गेल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.