Nashik News: मालेगाव अग्निशमन दल आधुनिकीकरणाच्या दिशेने; वर्षभरात 219 घटनेत सव्वादोन कोटींवर नुकसान

मालेगावात दाट लोकवस्ती असून यातील बहुतेक गरिबांची घरे लाकडाची आहेत, यामुळे आगीच्या घटना वाढत आहेत.
Malegaon Municipality
Malegaon Municipalityesakal
Updated on

मालेगाव : मालेगावात दाट लोकवस्ती असून यातील बहुतेक गरिबांची घरे लाकडाची आहेत, यामुळे आगीच्या घटना वाढत आहेत.

मात्र त्यावर मात करीत वेळीच अग्निशमन यंत्रणा पोचावी तसेच अडचणीच्या ठिकाणीही आग विझविता यावी यासाठी मनपाच्या अग्निशमन दलाचे आधुनिकीकरण करण्यावर भर दिला जाईल.

अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढली जातील अशी माहिती आयुक्त रवींद्र जाधव यांनी दिली. (Towards modernization of fire brigade 219 incidents during year loss over 152 crores malegaon municipality Nashik News)

शहरात झोपडपट्ट्यांची संख्या लक्षणीय आहे. प्लास्टिक, यंत्रमाग, गिट्टी कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. वर्षभरात शहर व तालुक्यात २१९ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. यात सुमारे २ कोटी २८ लाख ६३ हजार ४८९ रुपयांचे नुकसान झाले.

प्रतिकूल परिस्थितीत अरुंद गल्ली, बोळातील आग विझवून अग्निशमन दलाने यात १२ कोटी ५१ लाख ५६ हजार ५०० रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान वाचविण्यात यश मिळविले आहे या पार्श्वभूमीवर आयुक्तांशी संपर्क केला असता त्यांनी वरील माहिती दिली.

शहरात शॉटसर्किट व अनेक कारणांमुळे आगीच्या घटना घडतात. येथे प्लास्टिक कारखाने व घरांना आग लागण्याचे प्रमाण जास्त आहे.

गेल्या सहा ते सात वर्षात आगीच्या मोठ्या घटना घडल्या असून यात द्याने, म्हाळदे, स्टॉर हॉटेलजवळ प्लास्टिक कारखान्यांना तसेच येथील नागछाप झोपडपट्टी, रमजानपुरा भागातील संजरी चौक, नवकिरण सायजिंग जवळ पाठीमागे असलेली झोपडपट्टी, कमालपुरा, किल्ला झोपडपट्टी, म्हाळदे मिल्लत जवळच्या नवीन वस्तीत, आयेशा नगर भागातील नुरी नगर यासह विविध झोपडपट्ट्या आगीच्या विळख्यात सापडल्या.

आगीत अनेकांचे संसार उघडे पडून लाखोंचे नुकसान झाले. उन्हाळ्यात प्रामुख्याने जास्त आगीच्या घटना घडतात.

Malegaon Municipality
Nashik News: पिंपळगावमध्ये पसरतेय बँका, पतसंस्थाचे जाळे! बँका जाताहेत ग्राहकांच्या दारात

आग विझवितांना कसरत

मालेगावात दाट लोकवस्ती असल्याने शॉटसर्किटने आगी लागण्याचे प्रमाण जास्त आहे. आग विझवितांना अग्निशमन दलाच्या जवानांना तारेवरची कसरत करावी लागते. पूर्व भागात अरुंद गल्ल्यात अतिक्रमणच्या विळखा आहे.

अनेक ठिकाणी दिवसेंदिवस अतिक्रमणामुळे रस्ते व गल्लीची रुंदी कमी होत आहे. येथे गुलशेरनगर, आयेशानगर, पवारवाडी, रमजानपुरा यासह विविध भागात जागेच्या कमतरतेमुळे मुंबईसारखी परिस्थिती निर्माण होत आहे.

विविध भागातील नागरिकांनी गटारीवर न्हाणीघर, पाण्याच्या टाक्या केल्या आहेत. अतिक्रमणांमुळे रस्ते अडविले जातात. वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. झोपडपट्टीतील फळी व बांबू बल्ल्यांच्या घरास आग लागल्यास कमी वेळेत आग रौद्र रूप धारण करते.

अशा वेळी अरुंद गल्ल्यांमधून अग्निशामक बंब नेण्यात अडचणी येतात. आग विझवितांना मुख्य रस्त्यावरून दीड ते दोनशे फूट पाइप जोडून पाणी मारावी लागते.

या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी अग्निशमन दल मजबूत करण्यात येणार आहे. आणखी काही नवीन छोटी वाहने घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच अग्निशमन दलात प्रशिक्षण घेतलेल्या अग्निशमन जवानांची नवीन भरती करण्यात येईल असेही आयुक्तांनी सांगितले.

वर्षभरातील आगीच्या घटना

जानेवारी - २०

फेब्रुवारी - ३१

मार्च - २९

एप्रिल - २५

मे - ३५

जून - १२

जुलै - ५

ऑगस्ट - १४

सप्टेंबर - ४

ऑक्टोबर - ५

नोव्हेंबर - २६

डिसेंबर - १

Malegaon Municipality
Nashik News: सिन्नर नगरपरिषदेचा कारभार ‘रामभरोसे’! नियमित स्वच्छता होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.