Nashik Crime News : मुल्हेर (ता. बागलाण) येथील जामोटी शिवारातील बापू नथू जगताप यांचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर व विलास जगताप यांचे ट्रॅक्टरचे रोटर रात्री चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
परिसरात अनेक दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र सुरूच असून तपास लागत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त होत आहे. (tractor and roter stolen from farm nashik crime news)
पंधरा दिवसांपूर्वी अंतापूर येथील आनंदा गवळी यांच्या शेतातून सोयाबीन, कांदा व ११० कॅरेट असा एकूण पावणेतीन लाखाचा माल चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी (ता. ६) रात्री जगताप यांच्या जामोटी शिवारातील शेतात कांदा चाळीत असलेला आठ लाख रुपये किमतीचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर (एमएच ४१, ए ए ०३७०) व शेजारील विलास जगताप यांच्या शक्तिमान कंपनीचे एक लाख २० हजार रुपये किमतीचे रोटर चोरीस गेले आहे.
यापूर्वी श्री उद्धव महाराज समाधीतील दानपेटीतील रोख रक्कम, हेमंत वायकर, नंदू हगवणेंची मोटरसायकल, विजय पंडित यांची नवी बुलेट, सागर भानसे यांची पल्सर कंपनीची मोटरसायकल, हिराचंद सूर्यवंशी यांच्या ट्रॅक्टरची ट्रॉली, रामदास शिंदे यांचे रोटर, आबा येवला यांचा दोन वेळा शेतातून सोयाबीनची चोरी, शेती पंप, शेतातील साहित्य अशा असंख्य चोऱ्या होण्याचे प्रमाण वाढले आहे.
जगताप यांनी ट्रॅक्टर, रोटर चोरी झाल्याबाबत मुल्हेर पोलिस दूरक्षेत्राला तक्रार दाखल केली आहे. सोसायटी संचालक संदीप जगताप, रवींद्र गांगुर्डे, अतुल जगताप, भिका ढोबळे, शरद अहिरे, राहुल येवला हे वैयक्तिक तपास करीत असून पोलिस उपनिरीक्षक संजय वाघमारे, त्यांचे कर्मचारी या कामाचा शोध घेत आहेत. कुणाला ट्रॅक्टर व रोटर आढळल्यास ९६७३६८६१७७ या मोबाईलवर संपर्क साधावा असे जगताप यांनी कळविले आहे.
''यापूर्वी मुल्हेर येथीलच भिका ढोबळे यांचा स्वराज कंपनीचा नवा ट्रॅक्टर चोरीला गेला होता. संबंधित चोरट्यांनी ट्रॅक्टरचे दोन्ही मोठे डिक्ससह टायर बदलून तो ट्रॅक्टर मांगीतुंगी रस्त्यावरील शेवरे बारीत सोडून दिला होता.
दुष्काळी परिस्थितीत चोऱ्यांचे धाडसत्र थांबावे, यासाठी वरिष्ठ पातळीवरून दखल घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करून रात्रीची गस्त वाढवावी. ट्रॅक्टर व रोटर चोरीचा तपास लावणाऱ्यास ५१ हजार रूपयाचे बक्षीस देण्यात येईल.''-पंडितराव जगताप, माजी सरपंच, मुल्हेर)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.