देवळा : सौंदाणे रोडवरील धोबीघाट जवळ चारा वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर ठिणगी पडल्याने दोन ट्रॉली चारा खाक झाला.
यातच आग विझविण्यासाठी आलेले देवळा नगरपरिषद अग्निशमन दलाची गाडी उशिरा आल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त करत आलेली गाडी परत पाठवून दिली. (Tractor trolley transporting fodder caught fire angry citizens sent fire engine back nashi)
सध्या देवळा तालुक्यासह कसमादे पट्ट्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती असल्याने पशुपालक व शेतकरी सर्वत्र चाऱ्याच्या शोधात आहेत.
मालेगाव तालुक्यातील एरंडगाव येथील संदीप देवरे हे रविवारी (ता.५) रोजी सायंकाळच्या सुमारास कळवण तालुक्यातील पिळकोस येथून दोन ट्रॉली चारा घेऊन आपल्या एरंडगाव या गावी जात असताना देवळा-सौंदाणे रस्त्यावरील धोबीघाट या ठिकाणी कुणीतरी दुचाकीवरील अज्ञात व्यक्तीने चाऱ्याच्या मागच्या ट्रॉलीवर ठिणगी टाकल्याने चाऱ्याने पेट घेतला.
मागून येणाऱ्या गाडीने सांगितल्यावर ट्रॅक्टर चालकाने समय सुचकता दाखवत ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला पाण्याच्या ठिकाणी लावत स्थानिक तरुणांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येत नसल्याने या ठिकाणी दोन जेसीबी बोलावून चारा ट्रॉली वरून खाली खेचण्यात आला.
सुदैवाने ट्रॅक्टर व दोन ट्रॉल्या सुखरूप बाहेर काढण्यात आल्या. मात्र आगीत संपूर्ण चारा जळून खाक झाला.
बंब उशिरा आल्याने संताप
आगीच्या घटनेबाबत देवळा येथील नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाला संपर्क साधला असता अग्निशामक बंब उशिरा आल्याने सदर अग्निशमन बंबाला स्थानिकांनी विरोध करीत बंब पुन्हा पाठवून दिला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.