तलवारीचा धाक दाखवून व्यापाऱ्याचे अपहरण, 4 लाखाचे दागिणे लुटले

crime
crimeGoogle
Updated on

नाशिक : मुंबई आग्रा महामार्गावरील सर्व्हीस रोडवर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी तलवारीच्या धाकाने दुकानदाराला उचलून नेत, त्याच्याकडील सुमारे ४ लाखांचे दागिणे लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.


मुंबई आग्रा महामार्गावर सर्व्हीस रोड वर भरदुपारी हा प्रकार घडला. दुचाकीस्वार भामट्यांसह चौघांनी रस्त्यात सराफी व्यवसायीकाला उचलून स्वराज नगर येथील जंगलात ही लूट केली. संजय साधन बेरा (वय ४३, संत सावता माळी अर्पाटमेंट गणेशवाडी पंचवटी) यांच्या तक्रारीवरुन दोघा दुचाकीस्वार संशयिताविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहीती अशी संजय बेरा हे बुधवारी दुपारी दीडला त्यांच्या दुकानातून मुंबई आग्रा महामार्गावरील सर्व्‍हीस रोड जात असतांना दुचाकीवरुन आलेल्या संशयितांनी त्यांची जीवे मारण्याची धमकी देत दुचाकी अडवून दुचाकीवरुन बसवून नेत स्वराज्य नगर येथील जंगल झाडीत नेउन तेथे तलवारीच्या मागील बाजूने मारहाण करीत ९० हजाराची रोकड, साडे ३ ग्रॅमचे सोन्याचे मणी, साडे १७ ग्रॅमची सोन्याची चेन, साडे ६ ग्रॅमच्या मंगळसूत्र, साडे ४ सोन्याच्या वाट्या, ओपो मोबाईल असा सुमारे ३२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे जबरीने काढून घेतले.

crime
मुक्त विद्यापीठाच्या बीए, बीकॉम ऑनलाईन परीक्षा वेळापत्रकात बदल

त्यानंतर त्याच्याकडून सोन्याच्या दुकानाच्या चाव्या हिसकावून घेत व्यवसायीकाला इतर दोघांनी तेथेच बसवून ठेवले. तर तिसऱ्या संशयिताने व्यवसायीकांकडील चाव्या घेउन दुकानात जाउन दुकान उघडून दुकानातील ११ ग्रमच्या ८० सोन्याच्या मुरण्या, १२ ग्रॅमचे सोन्याचे ओम पान, ६ ग्रॅमचे सोन्याच्या अंगठ्या, २ ग्रॅमचे सोन्याचे टॉप्‍स, १२ ग्रॅमचे टॉप्स, १८ ग्रॅमचे सोन्याचे सुट्टे मणी असा सुमारे ७२.५ ग्रॅमचे दागिणे घेउन आले. त्यानंतर संशयितांनी पोलिसात तक्रार दिली तर जीवे मारुन टाकण्याची धमकी देत निघून गेले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस उपनिरीक्षक जगदाळे तपास करीत आहे.

crime
नाशिक मनपाची थकबाकीदारांसाठी अभय योजना; मिळणार ९० टक्‍क्‍यांपर्यंत सूट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.