शेतकऱ्यांनो, सोयाबीन विक्रीची घाई करू नका! व्यापाऱ्यांचे आवाहन

सोयाबीन
सोयाबीनGoogle
Updated on

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : शेतात सोयाबीनचे पीक डोलत असताना बाजारभाव आकाशाला भिडलेले होते. सोयाबीनला सोन्याच्या दराची झळाळी मिळत असल्याचे पाहून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र शेतातून सोयाबीन निघून बाजारपेठेत येण्यास सुरुवात होताच भावात घसरण झाली आहे, ही घसरण तब्बल तीन हजाराच्या घरात असून बाजारभाव सरासरी सहा हजार रूपये क्विंटल मिळत आहे. दरम्यान सोयाबीनला परदेशात मोठी असून भाव नक्कीच वाढतील, त्यामुळे शेतकऱ्यांनी लगेचच सोयाबीन विक्रीची घाई करू नये असे आवाहन काही व्यापाऱ्यांनी केली आहे.

जिल्ह्यात खरिपातील सोयाबीन निघू लागले असून लासलगावसह जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये सोयाबीनची बऱ्यापैकी आवक सुरू झाली आहे. खरीप हंगामावर शेतकऱ्यांचे आर्थिक गणित अवलंबून असते. जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीन, मक्याची पेरणी करून हंगाम कॅश करण्याचा प्रयत्न करतात. अवघ्या नव्वद दिवसात येणारे पीक म्हणून सोयाबीनची ओळख आहे. मागील हंगामात सोयाबीनचा दर प्रतिक्विटंल दहा हजार असा आकर्षक होता. मात्र शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडत नसल्याचे वास्तव आहे. रब्बी हंगामातील गहू काढणीनंतर निफाड तालुक्यातील सोळा हजारासह जिल्ह्यात 70 हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली. पण पेरणीनंतर लगेच पावसाने ओढ दिली. आता काढणीला आल्यानंतर पावसाने लगेच तळ ठोकला होता. जिल्ह्यातील काही भागात अतिपावसामुळे सोयाबीनच्या शेंगा काळ्या तर पाने पिवळी पडली. उत्पादन घटले आहे अशी परिस्थिती असताना मोठ्या कष्टानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी सुरू केली आहे.

सोयाबीन
जरा थांबा, कांदा हसविणार आहे; शेतकऱ्यांना जाणकारांचे आवाहन



लासलगाव बाजार समितीत दररोज सोयाबीनची सरासरी पाचशे क्विंटल आवक होत आहे. बाजारभाव किमान तीन हजार, कमाल सात हजार तर सरासरी सहा हजार रुपये मिळत आहे. गेल्या आठवड्यात नऊ हजार रुपये प्रतिक्विटंल असा दर असलेल्या सोयाबीनला घसरगुंडी लागली आहे. गेल्या हंगामातील कडाडलेल्या दरामुळे सोयाबीनचा पेरा वाढला होता, पण टोमॅटोसह पपई, कांद्याप्रमाणे आता त्याचे भाव घसरत आहेत, त्यामुळे चांगले उत्पन्न येईल या शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. शेतकऱ्यांकडे माल नव्हता त्यावेळी दर दहा हजार रुपये होते. शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून विक्रीसाठी बाजार समिती गाठताच दर घसरले आहेत. नवा सोयाबीन आर्द्रतेमुळे घेण्यास व्यापारी धजत नाही.

सोयाबीन
भुजबळ म्हणाले, 'आम्ही महाविकास आघाडीचे, आमचं आम्ही पाहून घेऊ'

सोयाबीनला असलेल्या ओलाव्यामुळे सध्या दरात घसरण झाली आहे. पण जपान, जर्मनी येथे भारतातील सोयाबीनला मोठी मागणी आहे. त्यामुळे दर पुन्हा वाढतील. शेतकऱ्यांनी सध्या सोयाबीन विक्रीची घाई करू नये.
- मंगेश छाजेड, व्यापारी, पालखेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.