Muharram 2023 : ताजिया स्थापनेची 305 वर्षांची परंपरा; सय्यद कुटुंबीयांकडून जोपासना

Haloka Tajia with 305 years of tradition
Haloka Tajia with 305 years of tradition esakal
Updated on

Muharram 2023 : मोहरम पर्वात काही मुस्लिम बांधवांकडून ताजिया स्थापनेची परंपरा आहे. सारडा सर्कल येथील इमामशाही सय्यद कुटुंबीयांकडून सुमारे ३०५ वर्षापासून ताजिया स्थापनेची परंपरा कायम ठेवली आहे.

यंदाही मंगळवार (ता. २५) उर्दू ६ तारखेस ताजेची स्थापना केली जाणार आहे.

मोहरम महिन्याची उर्दू १ तारखेस मोहरम पर्वास प्रारंभ होतो. दहा दिवस पर्व साजरा होतो. दहाव्या दिवशी आशुरा सणाने पर्वाची सांगता होते. (tradition of establishing Tazia has continued for about 305 years from Imam Shahi Syed family nashik news)

मोहरमच्या ६ तारखेस काही मुस्लिम बांधवांकडून ताजिया आणि सवारीची स्थापना केली जाते. दहाव्या दिवशी आशुरा सणास त्यांचे विसर्जन केले जाते. सारडा सर्कल येथील सय्यद कुटुंबीयांकडून दरवर्षी इमामशाही दर्गा परिसरात हलोका ताजियाची स्थापना केली जाते. सुमारे ३०५ वर्षापासून ताजियाची परंपरा जतन करून ठेवली आहे.

शेवटचे चार दिवस या ठिकाणी यात्रोत्सव साजरा होतो. सर्वधर्मीय भाविक येथे येऊन दर्शनाचा लाभ घेतात. त्यानंतर कुटुंबीयांसह यात्रेचा आनंद घेत असतात. भाविकांकडून नवसपूर्तीही केली जाते.

आशुराच्या दिवशी सारडा सर्कल परिसरातून ताजियाची मिरवणूक काढून विसर्जन करण्यात येते. जिल्हाभरातून सर्वधर्मीय बांधव दर्शनासाठी येतात. हलोका ताजिया नावाने येथील ताज्या प्रसिद्ध आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Haloka Tajia with 305 years of tradition
SAKAL Exclusive: प्रायोगिक नाटकांवर महिला विषयांची छाप! नाट्य संस्थांकडून नवनवीन, हटके प्रयोग

हलो के ताजियाची स्थापना मुस्लिम बांधवांकडून केली जात असली, तरी त्याचे विसर्जन मात्र आदिवासी बांधवांकडून केले जाते. ताजिया विसर्जनाच्या दिवशी खांदेकरीचा मान आदिवासी बांधवांचाच आहे.

वर्षभर हे बांधव कुठेही असोत मोहरम पर्वात विसर्जनाच्या दिवशी ते आवर्जून उपस्थितीत राहत असतात. तीन किलो कापूस, ३५ बांबू, बांबू चटई ६ नग, हलाव बी ३ किलो, हिरवा चमची कागद ७५० नग, लाल चमकी कागद १८० नग, झुंबर बॉल ३६ नग, लाल कापड २ मिटर, ५ जणांकडून सुमारे २५ दिवसात ताजिया साकारला जातो.

"परंपरेनुसार इमामशाही येथे हलोका ताजियाची स्थापना केली जाते. यंदाचे ताजिया स्थापना करण्याचे ३०५ वे वर्ष आहे. विशेषतः म्हणजे आदिवासी बांधवांना खांदेकरीचा मान आहे." - मीरकलीम सय्यद

Haloka Tajia with 305 years of tradition
Muharram 2023 : मोहरम पर्वास आजपासून प्रारंभ; मशिदीमध्ये कुराण खानी संपन्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.