Nashik News: मुल्हेर येथे पारंपरिक बोहाडा, नामसप्ताह; सर्वधर्मीय नागरिक जोपासताहेत अडीचशे वर्षांची परंपरा!

On the occasion of Namsaptah at Mulher, local citizens, Namsaptah Committee, Gram Panchayat officials participating in the procession wearing masks of Ganpati and Saraswati.
On the occasion of Namsaptah at Mulher, local citizens, Namsaptah Committee, Gram Panchayat officials participating in the procession wearing masks of Ganpati and Saraswati.esakal
Updated on

अंतापूर : मुल्हेर (ता. बागलाण) येथे श्री उद्धव महाराज जयंती नामसप्ताहानिमित्त पारंपारिक बोहाडा, यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यानिमित्त अखंड नामजप सेवा आणि बोहाडानिमित्त विविध देवदेवतांची सोंगे काढण्यात आली.

परिसरातून यात्रेसह बोहाडातील सोंगे पाहण्यास नागरिकांनी गर्दी केली होती. (Traditional Bohada at Mulher Namasaptah Two half hundred years of tradition cultivated by citizens of all religions Nashik News)

श्री. उद्धव महाराज यांच्या जयंतीनुसार येथील श्री. हरिनाम सप्ताहास गेल्या २५० वर्षाची परंपरा लाभली आहे. काही खंडानंतर साधारणतः १९५२- ५३ च्या काळात ही परंपरा पुन्हा सुरू कऱण्यात आली.

नामसप्ताह कालावधीत तेव्हापासून गावातील सर्व बाराबलुतेदार समाजांना सेवेची संधी असावी व सर्वांचा सहभाग असावा असे नियोजन करून प्रत्येकी समाजनिहाय तीन तास अखंड हरिनाम जप करण्याची (अष्टोप्रहर पहारा) रचना करण्यात आली.

‘सीताराम सीताराम, सीताराम जय उद्धव राम’ असा नामजप करीत अखंड सेवा सर्व समाजातील सेवेकरी तेव्हापासून ते आजतागायत न चुकता करीत असतात.

नामसप्ताह कालावधीत विविध कीर्तन, भजन, पारायण यांचाही समावेश पारंपारिक प्रथेला खंडीत न करता श्री उद्धव महाराज संस्थानच्या मठाधिपती वै. डॉ. रघुराज महाराज यांनी सुरू केली होती.

सप्ताहानिमित्त गावात यात्रा भरविण्यात येऊन शेवटच्या तीन दिवस ‘रामलीला’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास ‘बोहाडा' किंवा सोंगांचा कार्यक्रम म्हणूनही ओळखले जाते. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी संपूर्ण रात्रभर हा कार्यक्रम सुरू होता.

On the occasion of Namsaptah at Mulher, local citizens, Namsaptah Committee, Gram Panchayat officials participating in the procession wearing masks of Ganpati and Saraswati.
Nashik: शाळेत फुलवली नैसर्गिक पोषण परसबाग! नित्यानंदनगर प्राथमिक शाळेत पौष्टिक पालेभाज्या अन फळभाज्या बहरल्या

सकाळी देवींची मिरवणूक काढून प्रत्येक घराजवळ सडा, रांगोळी काढून महिलांनी पूजन करून भक्तराज महाराज यांच्या उपस्थितीत उद्धव महाराजांच्या पादुकांची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. सकाळी महाआरती करून भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

नामसप्ताह कमिटीचे अध्यक्ष प्रकाश येवला, उपाध्यक्ष शेखर पंडित, सदस्य तुळशीराम जगताप, दत्ता तिवारी, बापू कुटे, सुनील चव्हाण, रामदास जाधव, भिका बागूल, सरपंच निंबा भानसे, योगेश सोनवणे, संदीप जगताप, सुभाष येवला, श्याम शहा, चंद्रकांत खरे, अक्षय येवला, तुषार तिवारी यांच्यासह आदिवासी परिसरातील नागरिक उपस्थित होते. जायखेड्याचे पोलिस अधिकारी पुरुषोत्तम शिरसाट, सहाय्यक संजय वाघमारे, हवालदार सुनील पाटील यांनी बंदोबस्त ठेवला होता.

नामसप्ताह अन वेशभूषा

बोहाडा कार्यक्रमात मुल्हेरसह परिसरातील नागरिकांनी सहभाग घेतला होता. सर्वप्रथम गणपती, सरस्वती, चंद्रसूर्य, एकादशी, द्वादशी, अग्नीवेताळ, नरसिंह, दत्त, पांडव, संपूर्ण विराट, रावण, तंट्याभिल, डुक्कर, नंदी, हबाडाकीण, मच्छअवतार आदी सगळेच देवतांची वेशभूषा करून संबळवाद्य व मशाल उजेडात नृत्यमिरवणूक काढण्यात आली.

On the occasion of Namsaptah at Mulher, local citizens, Namsaptah Committee, Gram Panchayat officials participating in the procession wearing masks of Ganpati and Saraswati.
Navratri 2023: गोदाघाट परिसरात टिपऱ्यांचा बाजार सजला! नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.