Nashik: सामाजिक सलोखा जपणारा ‘पारंपारिक मिरवणूक मार्ग’! अन्य शहरांसाठी आदर्श अन्‌ नाशिककरांसाठी अभिमान

Procession
Processionesakal
Updated on

Nashik : शहरातील सर्वधर्मियांतर्फे वेळोवेळी काढण्यात येणाऱ्या विविध मिरवणुका ह्या वाकडी बारव ते पंचवटी या पारंपारिक मार्गावरून निघतात. गेल्या अनेक दशकांपासून शांततेत, उत्साहात आणि निर्विघ्नपणे निघणाऱ्या विविध धर्मियांच्या मिरवणुकांचा साक्षीदार असलेला जुने नाशिक भागातील हा पारंपारिक मिरवणुक मार्ग शहरातील धार्मिक, सामाजिक एकोप्याचेही प्रतीक ठरत आहे. (Traditional procession route that preserves social harmony role model for other cities and pride for nashik news)

मुळातच जुने नाशिक परिसर हा विविध प्रकारच्या विशेषतांनी नटलेला आहे. त्यापैकीच एक म्हणजे हा पारंपरिक मिरवणूक मार्ग होय. अनेक दशकांपासून वाकडी बारव ते पंचवटीपर्यंतचा, त्यातही विशेषत: वाकडी बारव ते बादशाही कॉर्नरपर्यंतचा पारंपरिक मिरवणूक मार्ग वर्षानुवर्षे धार्मिक व सामाजिक एकोपा जपत आला आहे.

गणेश विसर्जन मिरवणूक असो, मुस्लिम बांधवांचे जुलूस असो वा विविध धर्मियांकडून वेळोवेळी जयंती-पुण्यतिथीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकाही दरवर्षी याच मार्गावरून जातात. विशेष म्हणजे, मिरवणुक कोणत्याही जाती-धर्माची असली, तरी शहरातील सर्वधर्मीय बांधवांचा त्यात उत्स्फूर्त सहभाग असतो.

त्यामुळे अन्य धर्मांतील रूढी-परंपरा जपण्याचे कामही या मिरवणुकांच्या माध्यमातून होत असते. शिवाय, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासही त्यामुळे मदत होते. तद्वत्‌च दोन समाजांत तेढ निर्माण करू पाहणाऱ्या समाज कंटकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचेच काम सर्वधर्मीय बांधव त्याद्वारे करत असतात.

मिरवणुकीच्या वेळी संबंधितांचे स्वागत सत्कार करण्याबरोबरच मिरवणुकीत सहभागी होण्यासाठीही कोणत्याही धर्माच्या नागरिकाला कुठलीही अडकाठी नसते. त्याऐवजी त्यातील सर्वधर्मियांच्या सहभागातून सामाजिक एकोप्याचेच दर्शन होत असते.

हनुमान जयंती मिरवणूक आणि गणेश विसर्जन मिरवणूकांमध्ये अशा प्रकारच्या सलोख्याचे दर्शन यापूर्वीही घडून आले आहे. एकूणच हा मार्ग केवळ मिरवणूक मार्ग नसून, धार्मिक, सामाजिक एकोप्याची साक्ष देणारा आणि राज्यातील इतर शहरांना आदर्श ठरणारा मार्ग आहे. यात आणखी मानाची बाजू म्हणजे, निवृत्तीनाथ महाराजांची पालखीदेखील याच मार्गाने मार्गस्थ होत असते.

दरम्यान, राजकीय हेतूपोटी काही समाजकंटकांनी १९८२-८३मध्ये शिवजयंती मिरवणुकीस गालबोट लावण्याचा प्रयत्न केला होता. हा एकमेव अपवाद वगळता आजपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार या मार्गावर कधीच घडलेला नाही किंवा भविष्यातही घडणार नाही, अशी साक्ष येथील सर्वधर्मीय बांधवांकडून देण्यात येते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Procession
Jal Jeevan Mission : एक क्लिकवर कळणार जलजीवनच्या कामाची सद्यः स्थिती; जाणुन घ्या सविस्तर

प्रमुख मिरवणुका

* गणेश विसर्जन मिरवणूक

* शिवजयंती

* ईद-ए-मिलाद जुलूस

* जुलूस-ए-गौस

* डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

* महात्मा फुले जयंती

* हनुमान जयंती

* अण्णाभाऊ साठे जयंती

"जुने नाशिक भागातील पारंपारिक मुख्य मिरवणूक मार्ग हा इतर शहरांसाठी आदर्शवत्‌ आहे. या मार्गावरून सर्वधर्मीय मिरवणुका शांततेत व निर्विघ्नपणे निघत असतात. त्यात कुठलाही अनुचित प्रकार घडत नाही. नाशिककर म्हणून आम्हा सर्वांसाठी ही बाब भूषनावह आहे."

-रामसिंग बावरी, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदू एकता आंदोलन

"गेल्या ४० वर्षाहुन अधिक काळापासून जुने नाशिक मिरवणूक मार्गावरील सर्वच मिरवणुकांचे पोलीस विभागासाठी छायाचित्र काढण्याचे काम करत आलो आहे. नेहमी सर्व मिरवणुकांमध्ये धार्मिक सामाजिक सलोख्याचे दर्शन घडताना दिसले."-सलीम खान, ज्येष्ठ छायाचित्रकार

Procession
Summer Season : खारघरच्या पार्श्वभूमीवर पहिनेत ZP अलर्ट! उष्माघाताचा धोका बघता आरोग्य पथक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.