Nashik Traffic News: नादुरुस्त बसमुळे वाहतूक खोळंबली! मुंबई नाक्याकडे जाताना वाहनांच्या लागल्या रांगा

Nashik Traffic News: नादुरुस्त बसमुळे वाहतूक खोळंबली! मुंबई नाक्याकडे जाताना वाहनांच्या लागल्या रांगा
esakal
Updated on

Nashik News : गडकरी चौकाकडून महामार्ग बसस्थानकाकडे जाताना राजयोग हॉटेलसमोरच राज्य परिवहन महामंडळाची भुसावळ आगाराची बस नादुुरुस्त झाली. रस्त्यावरच या बसच्या दुुरुस्तीचे काम करावे लागले.

मात्र ऐन सायंकाळच्या वेळी सदरचा प्रकार घडल्याने या रोडवरील वाहतूक कोंडीमध्ये आणखीच भर पडली. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. (Traffic disrupted due to broken MSRTC bus Queues of vehicles on way to Mumbai Naka Nashik News)

Nashik Traffic News: नादुरुस्त बसमुळे वाहतूक खोळंबली! मुंबई नाक्याकडे जाताना वाहनांच्या लागल्या रांगा
Traffic Transport Block : पनवेल स्थानकात आणखी नवीन ट्रॅफिक वाहतूक ब्लॉक!

राज्य परिवहन महामंडळाच्या भुसावळ आगाराची भुसावळ-वसई बस (एमएच १४ केक्यु ३६३०) गडकरी चौकातून महामार्ग बसस्‌थानकाकडे येत होती. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास बस संदीप हॉटेलसमोरील राजयोग हॉटेलसमोर असतानाच बंद पडली.

बसचालकाने बस पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात अपयश आले. त्यामुळे बस जागेवर थांबवून प्रवाशांना उतरविण्यात आले.

तसेच, महामंडळाच्या मोटारदुरुस्ती विभागाला संपर्क साधून त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी हजर झाले. बसमधील बिघाड शोधून काढण्याचे काम जागेवर सुरू करण्यात आले.

मात्र नेमकी सायंकाळची वेळ असल्याने या रोडवर आधीच वाहतूक जादा असते. सकाळ-सायंकाळी मुंबई नाका सर्कल वाहतूक कोंडीमुळे आधीच जाम असतो. त्यात बस नादुरुस्तीची भर पडली.

त्यामुळे गडकरी कालिका माता मंदिरापर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. बसच्या एका बाजुने वाहने मार्गस्थ केली जात होती. परंतु सायंकाळची वेळ असल्याने याच वेळेत घरी परतणार्यांची संख्या अधिक असते. यामुळे अनेकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.

Nashik Traffic News: नादुरुस्त बसमुळे वाहतूक खोळंबली! मुंबई नाक्याकडे जाताना वाहनांच्या लागल्या रांगा
Pune Traffic : कोंडी फोडण्यासाठी तातडीने पर्यायी मार्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.