Nashik News : मुंबई नाका ते काठे गल्ली सिग्नल या दरम्यान वाढते अपघात लक्षात घेऊन तातडीने गतिरोधक टाकावे या नागरिकांच्या मागणीला पोलीस वाहतूक शाखेने तत्पर प्रतिसाद देत महापालिकेकडे गतिरोधक टाकण्यासंदर्भात पत्राद्वारे मागणी केली आहे. (Traffic jam from Mumbai Naka to Kathegalli Traffic police response to citizens demands Nashik News)
द्वारका सर्कल ते मुंबई नाकादरम्यान शहराच्या मध्यवर्ती भागात जाण्यासाठी अनेक रस्ते एकत्र येतात. त्यामुळे सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी वाढते. परिणामी वाहतूक कोंडीची समस्या या भागात नित्याची झाली आहे.
मुंबई आग्रा रोड व पुणे रोडला जोडणारा मुंबई नाका ते काठे गल्ली हा रस्ता सध्या सर्वाधिक रहदारीचा झाला आहे. या भागात दाट लोकवस्ती, रस्त्याच्या दुतर्फा मोठे व्यवसायिक व रहिवासी इमारती आहेत.
दादासाहेब गायकवाड सभागृह, रेडीएन्ट हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, शाळा व अन्य अनेक व्यवसायिक आस्थापना या रस्त्यालगत आहेत. नवशक्ती चौक, नागजी चौक, अंबिकानगर या ठिकाणी फळे व भाजीपाला विक्रेत्यांचे अतिक्रमणदेखील या रस्त्यावर आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
त्यामुळे रहदारीला मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होते. वाहनांचा वेग अधिक असल्याने या रस्त्यावरील चौकांमध्ये गंभीर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्याला आळा घालण्यासाठी अतिक्रमणे हटविण्याबरोबरच गतिरोधक टाकण्याची मागणी नागरिकांनी माजी उपमहापौर प्रथमेश गीते यांच्याकडे केली होती.
त्या अनुषंगाने पोलिसांकडे पत्रव्यवहार करण्यात आला. पोलिसांनी तातडीने दखल घेत नवशक्ती चौक, नागजी चौक, पखाल रोड चौक, अंबिकानगर चौकात गतिरोधक टाकावे अशी मागणी महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे नोंदविली आहे. त्यामुळे लवकरच गतिरोधक टाकून या भागातील वेगवान वाहनांच्या गतीला ब्रेक लागणार आहे.
"मुंबई नाका ते काठे गल्ली सिग्नलदरम्यान वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त व पोलिस आयुक्तांकडे रस्त्यांवर गतिरोधक टाकण्याची मागणी केली होती. शासकीय स्तरावर कारवाई सुरु झाली आहे." -प्रथमेश गिते, माजी उपमहापौर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.