Nashik Traffic News : रविवारी रात्री शहरातील वाहतुकीचा ‘चक्काजाम’!

Traffic News
Traffic Newsesakal
Updated on

नाशिक : रविवार (ता. २५) शहरातील वाहतुकीचा चक्काजाम करणारा ठरला. रविवार अन्‌ त्यात नाताळ सुटीमुळे सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर वाहनांची गर्दी झाल्याने ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊन सिग्नल यंत्रणाही कोलमडून पडल्याने अनेकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. त्यातच प्रसिद्ध सिनेगायकाचा लाइव्ह कॉन्सर्ट ऐकण्यासाठी जमलेले रसिक आणि हॉटेलिंगसाठी बाहेर पडलेल्या नाशिककरांमुळे गोविंदनगर, लवाटेनगर, महात्मानगरसह कॉलेज रोडवर वाहतुकीची कोंडी झाली होती. (Traffic jam in city on Sunday night Nashik Traffic News)

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

Traffic News
ZP CEO Ashima Mittal: ग्रामीण भागातील उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध : आशिमा मित्तल

रविवारी (ता. २५) नाताळाचा सण होता. त्यामुळे सायंकाळपासूनच शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. प्रामुख्याने एकाच मार्गावर मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक व्यवस्थाच कोलमडून पडली. लवाटेनगर या परिसरात खानदेश मेळावा सुरू आहे. याच परिसरात एका सिनेगायकाचा कॉन्सर्ट होता. तसेच, सिटी सेंटर मॉलही याचठिकाणी असल्याने रविवारची संधी साधून मोठ्या प्रमाणात या परिसरात गर्दी झाली.

वाहनेही मोठ्या संख्येने आल्याने या साऱ्याचा ताण सिटी सेंटर मॉल ते गोंविदनगर रस्ता, लवाटेनगर, एबीबी सिग्नल, महात्मानगर, कॉलेज रोड, मायको सर्कल या रस्त्यावर पडला. रात्री उशिरापर्यंत वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. सिद्धेश्‍वर धुमाळ यांच्यासह दोन युनिटची वाहतूक पोलिसांची पथके वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत होते. सिग्नलव्यवस्था कोलमडून पडली.

या वाहतूक कोंडीमुळे अनेक चालकांमध्ये तू तू-मैं मैंचे प्रसंग घडले. काही ठिकाणी चारचाकी आणि दुचाकींमध्येही किरकोळ अपघाताचे प्रकार घडले. यातून मोठा अनुचित प्रकार घडला नसला तरी एक-दोन कार्यक्रमांमुळे मात्र वाहतूक पोलिसांचे नियोजन कोलमडल्यानेच वाहतूक कोंडी झाल्याचे समोर आले आहे.

Traffic News
Nashik News : डॉक्टरांना रेखाचित्राचे रुग्णाने दिले Suprise!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()