नाशिक : मुंबई- आग्रा महामार्गावरील औरंगाबाद नाक्यापासून ते तपोवन चौफुलीचा उड्डाणपुलाखालील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ही लगतच्या सर्व्हिस रोडवरून वळविण्यात आल्याने, आधीच अरुंद आणि रस्त्यालगत अवजड वाहनांच्या पार्किंगमुळे या मार्गावर दिवसभर वाहतूक कोंडी होती. त्याचा त्रास प्रवासी वाहनांसह अनेकांना सहन करावा लागला आहे. (Traffic jam on Aurangabad Naka to Tapovan Chaufuli road Nashik latest marathi news)
पावसामुळे मुंबई- आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाखालील रस्ते निसरडे झाले आहेत. चारचाकी वाहनांपेक्षा दुचाकी वाहने घसरून गंभीर स्वरूपाचे अपघात होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे सदरील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसा सूचना फलक औरंगाबाद नाका येथे लावण्यात येऊन रस्ता बॅरिकेटींग करून बंद करण्यात आलेला आहे.
तर या मार्गावरील वाहतूक तपोवन चौफुलपर्यंत सर्व्हिस रस्त्यावरून वळविण्यात आली आहे. परंतु सदरील रस्त्यालगतच अवजड वाहनांचे गॅरेजेस आहेत. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी आधीच अरुंद झाला आहे.
तसेच, रस्त्यालगतच अवजड वाहने पार्क केलेली आहे. यामुळे अवजड वाहनांसह बस, प्रवासी वाहने, रिक्षा, दुचाकी सर्व्हिस रोडने जात असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. यातून मार्गक्रमण करणे वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरते आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.