Nashik Traffic Problem : नाशिक रोडला सध्या ट्रॅव्हल एजन्सीच्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. बिटको चौकापासून तर थेट छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत या ट्रॅव्हल बस व वाहने उभी राहतात.
पर्यायाने मार्गक्रमण करताना वाहनधारकांसह आबालवृद्धांना ट्रॅफिक जामचा सामना करावा लागत आहे. वाहतूक पोलिस ट्रॅव्हल एजन्सीच्या बसकडे सोईस्कर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. (Traffic jam on Nashik road due to travel bus nashik)
नाशिक रोडला दत्तमंदिर चौकापासून थेट छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत ट्रॅव्हल कंपनीच्या बस ग्राहकांना घेण्यासाठी उभे राहतात. शिर्डी, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, मिरज, मुंबई या ठिकाणी या ट्रॅव्हल एजन्सीच्या बस पकडण्यासाठी ग्राहक रस्त्यावर उभे असतात.
तिकीट बुक केलेले असल्यामुळे बिटको चौकात मोठ्या प्रमाणावर या बस रोज थांबत आहे. पर्यायाने मोठी जागा व्यापल्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिक व वाहनधारकांना करावा लागतो. येथील दुकानदारही या ट्रॅव्हल एजन्सीच्या जाचाला वैतागले आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या बस रस्त्यावर उभे राहत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. पर्यायाने या रस्त्याने मार्गक्रमण करण्यासाठी अनंत अडचणींचा सामना सध्या वाहनधारकांना करावा लागत आहे.
वास्तविक पाहता या ट्रॅव्हल एजन्सीच्या आलिशान बसने पुलावरून मार्गक्रमण करणे अपेक्षित आहे, मात्र वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे येथे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे.
पोलिस केवळ बिटको चौकातील सिग्नल यंत्रणा सांभाळत असतात. नियमबाह्य थांबा घेणाऱ्या या ट्रॅव्हल एजन्सीच्या बसला आळा घालण्याची मागणी नागरिक करीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.