Traffic Problem: रामतीर्थ परिसरात वाहतूक कोंडी नित्याची! वाहनधारकांसह व्यावसायिकांना होतोय मोठा मनस्ताप

Nashik Main Road
Nashik Main Roadesakal
Updated on

नाशिक : रामतीर्थावरील वाहतूक कोंडी ही आता नित्याचीच बाब झाली आहे. दशक्रिया व अन्य धार्मिक विधीसाठी येणाऱ्यांची संख्या मोठी असून दिवसेंदिवस त्यात भरच पडत आहे. मात्र, या कोंडीमुळे या रस्त्याने नियमित प्रवास करणाऱ्यांसह परिसरातील व्यावसायिकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. (Traffic jams common in Ramtirtha area Professionals along with vehicle owners suffering nashik news)

श्राद्धादी विधीसाठी रामतीर्थाकडे भल्या सकाळपासून वाहनांची रिघ लागते. ही वाहने गौरी, म्हसोबा पटांगणासह साईबाबा मंदिरासमोरील जुन्या भाजी बाजाराच्या जागेवर उभी केली जातात. यातील वाहने मालेगाव स्टॅन्ड, गणेशवाडी, नवीन शाही मार्ग, दिल्ली दरवाजा, नाव दरवाजा या भागातून गंगाघाटावर येतात.

सकाळच्या सुमारास ही संख्या मोठी असते. याच काळात रामतीर्थासमोर शेकडो दुचाकी वाहने उभी केली जातात. शिवाय वस्त्रांतर गृहाशेजारी रिक्षा स्टॅन्ड आहे. याशिवाय चारचाकी हातगाडीवर व्यवसाय करणारेही सकाळपासूनच या ठिकाणी ठिय्या मांडतात.

त्यामुळे रामतीर्थासह कपालेश्‍वर मंदिराच्या मागील बाजू, सांडव्यावरील देवी मंदिर, रामतीर्थासमोरील पोलिस चौकी, सरदार चौक या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी होते.

सर्वच प्रकारच्या वाहनांना रामतीर्थाकडे जाण्यास मज्जाव केल्यास वाहतुकीची ही कोंडी होणार नाही, असे स्थानिकांसह काही पोलिस कर्मचाऱ्यांचेही म्हणणे आहे. रामतीर्थाकडे जाणाऱ्या वाहनांना अलीकडच्या चौकातच अडविल्यास रामतीर्थावरील गर्दी आपसूकच कमी होईल.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

Nashik Main Road
Nashik News : ZP कार्यकारी अभियंता सोनवणे रुजू

मोठी अतिक्रमणे

दिवसभर मोठी वर्दळ असलेल्या रामतीर्थ परिसरातील चौकात मोठ्या प्रमाणावर दुचाकी वाहने उभी केली जातात. त्यातच वस्त्रांतर गृहाशेजारी व पांडे मिठाईसमोर असे दोन रिक्षा स्टॅन्ड या ठिकाणी आहेत.

त्यातच फळ विक्रेत्यांच्या चारचाकी हातगाड्याही याच ठिकाणी उभ्या केल्या जातात. ही अतिक्रमणे हटविल्यास हा परिसर अतिक्रमणमुक्त होऊन रामतीर्थही मोकळा श्‍वास घेईल.

येथेही होतेय कोंडी

कपालेश्‍वर मंदिराच्या शेजारून पंचवटी कारंजाकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. तसेच कारंजाकडून थेट रामतीर्थावर येणे सोपे होत असल्याने मालवीय चौक, गोगाबाबा पतसंस्थेकडून वाहने मोठ्या प्रमाणावर रामतीर्थावर येतात.

आधीच चिंचोळा रस्ता, त्यातच परिसरातील हॉलमध्ये दशक्रिया विधीसाठी आलेल्यांची वाहनेही याच ठिकाणी उभी केली जात असल्याने कोंडीच मोठी भर पडते. हॉलच्या भाड्यातून अवघ्या दोनचार तासात चांगले भाडे मिळत असल्याने अलीकडे हा भाग जणू ‘दशक्रिया विधीसाठी हॉलचा हब’ झाल्यासारखीच स्थिती आहे.

Nashik Main Road
नारोशंकराची घंटा : अहो, रद्दी फक्‍त एक किलो आहे..!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.