Nashik Traffic News : ट्रॅफिक जामचा तिढा काही सुटेना; सायंकाळी 2 तास लागतात वाहनांच्या रांगाच रांगा

Nashik Traffic News
Nashik Traffic Newsesakal
Updated on

Nashik News : मुंबई- आग्रा महामार्गावर उड्डाणपूल, शहराभोवती रिंगरोडचे जाळे विस्तारले. असे असले तरीही शहरातील ‘ट्रॅफिक जाम’चा तिढा सुटण्याऐवजी दिवसागणिक वाढतो आहे.

विशेषतः महामार्गावर सायंकाळी द्वारका, मुंबई नाका, इंदिरानगर बोगदा, पाथर्डी फाटा यासह शहरातील जुना गंगापूर नाका, उपनगर नाका, सिटी सेंटर मॉल या ठिकाणी ट्रॅफिक जामची समस्या वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरते आहे. (Traffic jams Problem In Nashik Increase Queue of vehicles take 2 hours in evening Nashik Traffic News)

यामुळे वाहनचालकांच्या वेळेचा तर अपव्यय होतोच आहे, शिवाय इंधनाचीही नासाडी होऊन पर्यावरणाचीही हानी होत आहे. तर दुसरीकडे वाहतूक पोलिसांकडून उपाययोजना करूनही कोंडी सुटलेली नाही.

मुंबई- आग्रा महामार्गावरील अवजड वाहतूक आणि नित्याचे अपघातासह वाहतूक कोंडीमुळे प्रशस्त उड्डाणपुलाची निर्मिती केली. तसेच, २०१४च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शहराभोवती रिंगरोडचे जाळे निर्माण करण्यात आले.

परंतु, आजमितीसही शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटल्याचे दिसून येत नाही. महामार्गावरील द्वारका चौक, मुंबई नाका सर्कल, इंदिरानगर बोगदा आणि पाथर्डी फाटा या ठिकाणी नित्याची वाहतूक कोंडी असते.

Nashik Traffic News
Nashik Accident News : कसारा घाटात 4 वाहनांचा विचित्र अपघात ; 2 जण ठार,1 जखमी; शेकडो कोंबड्या मृत्युमुखी

विशेषतः सायंकाळी सहा ते रात्री आठ-नऊ वाजेपर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या असतात. असेच काहीसे चित्र सिटी सेंटर मॉल, उपनगर नाका आणि जुना गंगापूर नाका या ठिकाणी पहावयास मिळते.

या तीनही ठिकाणी वाहतूक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित आहे. मात्र तरीही सायंकाळच्या वेळी हे तीनही सिग्नल ओलांडणे वाहनचालकांसाठी दिवास्वप्नच असते.

शहर हद्दीतील वाहनसंख्या

* दुचाकी : २० लाख ८० हजार

* रिक्षा : २६ हजार

* कार : दीड लाख

* अवजड : ३५ हजार

* बस : २ हजार ७०० (परिवहन महामंडळ)

* शहर बस : ११०० (सिटीलिंक)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik Traffic News
Nashik News : शिक्षकांच्या वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा सुरू; या तारखेपर्यंत नोंदणीस मुदत

अवाढव्य सर्कल अन्‌ अरुंद चौक

वाहतूक कोंडीसाठी वाहतूक बेटांवर उभारलेले अवाढव्य सर्कल आणि अरुंद चौक कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञांनी यापूर्वीच अनेकदा स्पष्ट केले आहे. द्वारका, मुंबई नाका चौकातील सर्कल आकाराने रुंद असल्याने वाहतूक कोंडी होते.

या सर्कलचा आकार कमी करावा यासाठी वाहतूक पोलिस शाखेने महापालिकेसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावा केला आहे. परंतु अद्याप त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही.

तर, इंदिरानगर बोगद्याची रुंदी वाढविण्याला मंजुरी मिळाली आहे. परंतु अजूनही प्रत्यक्ष कामास सुरवात झालेली नाही. त्याचप्रमाणे, पाथर्डी फाटा येथील चौकाची वाहतुकीच्या तुलनेने रुंदी कमी पडते. त्यामुळे या ठिकाणी वारंवार गंभीर अपघात होतात.

Nashik Traffic News
Jalgaon Crime: ऑनलाईन मैत्री पडली महागात! लग्नाचे आमिष देत मुलीवर अत्याचार

वेळेचा अपव्यय; इंधनाची नासाडी

मुंबईकडून पुणे रोडकडे जाण्यासाठी पाथर्डी फाटा येथून रिंगरोड आहे. गंगापूर रोड, सिडकोकडून नाशिक रोडकडे जाण्यासाठी इंदिरानगर बोगद्याकडून जाण्यासाठी रिंगरोड आहे.

सिडको, गंगापूर रोडकडून पंचवटीकडे जाण्यासाठी जुना गंगापूर नाक्यावरून चोपडा लॉन्सद्वारे पंचवटीत जाण्यासाठी रिंगरोड आहे.

मात्र या साऱ्या ठिकाणी सायंकाळी कोंडी होऊन वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागतात. परिणामी वाहनचालकांच्या वेळेचा अपव्यय होऊन इंधनाचीही नासाडी होते.

Nashik Traffic News
Cotton Rate News : यंदा कापसात केवळ 12 लाख गाठींचे उत्पादन; शेतकऱ्यांसह जिनर्सला गत हंगाम तोट्याचाच

"शहराचे विस्तारीकरण झपाट्याने होत आहे. त्यामुळे पूर्वीचे रिंगरोड आता शहरात सामील झाल्याने नव्याने रिंगरोड‌ची आवश्‍यकता आहे.

काही ठिकाणी स्मार्टसिटीअंतर्गत कामे सुरू असल्याने त्याचा परिणाम वाहतूक कोंडीवर होत आहे. काही सर्कलची रुंदी कमी

करण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. तरीही ट्रॅफिक जामच्या वेळी जादा वाहतूक पोलिस कर्तव्यावर देऊन समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे."

- प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त, शहर वाहतूक शाखा

Nashik Traffic News
दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.