Nashik: कालिका देवी यात्रोत्सवामुळे वाहतूक मार्गात बदल; नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाचे नियोजन

On the occasion of Navratri Festival, Kalika Temple was illuminated with electricity.
On the occasion of Navratri Festival, Kalika Temple was illuminated with electricity.esakal
Updated on

Navratri Traffic Management : शहराचे ग्रामदैवत असलेल्या कालिका देवी यात्रोत्सवानिमित्ताने नवरात्रोत्सव काळात महामार्ग बसस्थानक ते गडकरी सिग्नल या मार्गावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

नवरात्रोत्सव काळात दुपारी 12 ते 3 या वेळेव्यतिरिक्त या मार्गावर वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. (Traffic route changes due to Kalika Devi Yatrosva Planning of transport department in background of Navratri festival Nashik)

श्री कालिका देवी यात्रोत्सवाला रविवारपासून (ता. १५) प्रारंभ झाला. नाशिकचे ग्रामदैवत असल्याने कालिका देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक दर्शन घेण्यासाठी येत असतात. तसेच याचनिमित्ताने मंदिर परिसरात यात्रोत्सव असतो.

रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिकांचे दुकाने, रहाट पाळणेही दाखल होत असतात. त्यामुळे सकाळी-सायंकाळी देवदर्शनासाठी भाविकांची तर सायंकाळी भाविकांसह यात्रोत्सवाचा आनंद घेण्यासाठी हजारो भाविक येतात.

यासाठी नवरात्रोत्सव काळात मुंबई नाका ते गडकरी सिग्नलपर्यंतच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. संभाव्य वाहतूक कोंडी व गर्दी टाळण्यासाठी परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी वाहतुक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे.

या अधिसूचनेनुसार १५ ते २४ तारखेदरम्यान कालिका मंदिर परिसरातून होणाऱ्या सर्व प्रकाराच्या वाहतूकीला प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

वाहतूकीस प्रवेश बंदी

- गडकरी सिग्नल ते हॉटेल रुचीपर्यंतचा मार्ग

- चांडक सर्कल ते हॉटेल संदीपपर्यंतचा मार्ग

On the occasion of Navratri Festival, Kalika Temple was illuminated with electricity.
Navratri 2023 : उपवासाचा एवढा सोप्पा अन् पोट भरणारा पदार्थ तुम्ही पाहिला नसेल, १० मिनिटात बनवा पोटॅटो ट्रँगल्स!

पर्यायी वाहतूक मार्ग

- भवानी सर्कल ते मुंबई नाक्याकडे जाणारी वाहतूक सिबल फर्नीचर - नासर्डी पुल - आरडी सर्कल - इंदिरानगर जॉगींग ट्रॅकमार्गे इतरत्र

- चांडक सर्कल ते सीबीएस, शालिमार, सारडा सर्कल व द्वारकाकडे जाणारी वाहतूक चांडक सर्कल ते गडकरी सिग्नलमार्गे

- मोडक चौक सिग्नल येथून खडकाळी सिग्नल मार्गे 60 फुटी रोडने द्वारका सर्कल मार्गाने नाशिकरोड व सिडकोकडे

- मुंबई नाक्‍याकडून शहरात येणारी हलकी वाहने ही महामार्ग बसस्थानक, तूपसाखरे लॉन्स, हुंदाई शोरूमसमोरून चांडक सर्कल, भवानी सर्कल यामार्गे त्र्यंबकरोडने शहरात

- शहरातून सातपूर आणि अंबडकडे जाणारी वाहने द्वारका सर्कल मार्गे गरवारे-टी पॉईंट मार्गे सातपूर एमआयडीसीकडे.

- द्वारका सर्कलवरून पंचवटीत जाणारी जड वाहने ही कन्नमवार पूल, संतोष टी पॉईंट, रासबिहारी हायस्कुल मार्गाने पंचवटीकडे

- सारडा सर्कलकडून गडकरी चौकाकडे येणारी वाहने एन. डी. पटेल रोड, किटकॅट वाईन शॉप चौफुली मार्गाने मोडक सिग्नलमार्गे.

On the occasion of Navratri Festival, Kalika Temple was illuminated with electricity.
Pune Traffic-Navratri 2023 : नवरात्र उत्सवानिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.