Nashik News: आता UTS ॲपद्वारे काढता येणार रेल्वे तिकीट! 28 पथकांकडून भुसावळ विभागात जनजागृती

Railway Ticket Inspector while raising awareness among the passengers about ‘UTS’ app
Railway Ticket Inspector while raising awareness among the passengers about ‘UTS’ appesakal
Updated on

मनमाड (जि. नाशिक) : रेल्वे तिकीट घरासमोर प्रवाशांची गर्दी होवू नये तसेच प्रवाशांनी रांगेत उभे राहून वेळ घालविण्यापेक्षा रेल्वेने सुरू केलेल्या यूटीएस ॲपद्वारे अनारक्षित (जनरल) तिकीट काढता येणार आहे. याच अनुषंगाने मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात एक दिवसीय मोहीम घेण्यात आली.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील प्रमुख २४ प्रमुख स्थानकांवर वाणिज्य विभागाच्या कर्मचाऱ्यांद्वारे २८ पथके तयार करून यूटीएस म्हणजेच अनारक्षित तिकीट बुकिंग सुविधा (यूटीएस) या अॅपची जवळपास ८ हजार २२० प्रवाशांना माहिती दिली. तर एका दिवसात १ हजार ९७२ प्रवाशांनी मोबाईल मध्ये यूटीएस अॅप डाऊनलोड केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. (Train tickets can now purchased through UTS app Public awareness in Bhusawal division by 28 teams Nashik News)

भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. एस. केडिया यांच्या अध्यक्षतेखाली, मुख्य विभागीय वाणिज्य व्यवस्थापक शिवराज मानसपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली, भुसावळ विभागाचे वाणिज्य निरीक्षक आणि तिकीट निरीक्षक यांनीही भुसावळ विभागात २४ पथक तयार केले. त्यांनी भुसावळ ते इगतपुरी, बडनेरा ते भुसावळ, भुसावळ ते कटणी दरम्यान एकदिवसीय अनारक्षीत तिकीट अॅप प्रचार मोहीम यशस्वी केले.

तिकीट तपासनीस आणि कमर्शिअल इन्स्पेक्टर यांची एक संयुक्त टीम तयार करण्यात आली. सुमारे आठ हजाराहून अधिक जणांना माहिती देण्यात आली. भुसावळ-इगतपुरी एक्सप्रेस, भुसावळ-बडनेरा एक्सप्रेस आणि भुसावळ- कटणी या गाड्यांना भेट देऊन धावत्या प्रवासी रेल्वे गाडीत प्रवाशांना या ॲपबद्दल माहिती दिली.

शाळा, महाविद्यालयात जाऊन यूटीएस अॅपचे महत्त्व सांगून अॅप डाऊनलोड करून घेतले. भुसावळ मंडळाच्या सीसीआय, सीटीआय, सीबीएस, वाणिज्य विभागातील कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

Railway Ticket Inspector while raising awareness among the passengers about ‘UTS’ app
Nashik News : अंकाई फाट्यानजीक चारचाकी वाहनास पेट!

यूटीएस ॲपद्वारे अनारक्षित तिकीट भुसावळ विभागातील सर्व स्थानकांवर अनारक्षित तिकिटे देण्यात येतील. अनारक्षित तिकीट बुकिंग सुविधा रेल्वे प्रशासनाद्वारे काही निवडक स्थानकांवर एटीव्हीएम आणि यूटीएस ॲपद्वारे प्रवासी आपले तिकीट बुक करू शकतात. या सुविधांमुळे त्यांचा वेळ वाचण्यात मदत होत आहे.

भुसावळ विभागातील जवळपास ७७ टक्के प्रवासी त्यांची तिकिटे आयआरसीटीसी (IRCTC) सारख्या ऑनलाइन पद्धतीने बुक करतात आणि उर्वरित २३ टक्के प्रवासी तिकीट बुकिंगसाठी रेल्वे स्थानकातील तिकीट घरांमध्ये जातात.

परंतु अनारक्षित (जनरल ) तिकिटांसाठी फक्त २ ते ३ टक्के प्रवासी ऑनलाइन यूटीएस अॅपद्वारे तिकीट बुक करतात. त्यामुळे यूटीएस अॅपद्वारे आरक्षित नसलेल्या तिकिटांची ही ऑनलाइन टक्केवारी वाढवण्यासाठी भुसावळ विभागात एक दिवसीय मोहीम हाती घेण्यात आली.

विभागात १ हजार ९७२ प्रवाशांनी घेतले ॲप

भुसावळ विभागात असलेल्या भुसावळ स्थानकात २०८ , खंडवा स्थानकात १५६ प्रवाशांनी, मनमाड स्थानकात १३३, प्रवाशांनी चाळीसगाव स्थानकात १३३ प्रवाशांनी आणि नाशिक स्थानकात १२१ प्रवाशांनी हे ॲप डाऊनलोड केले आहेत

Railway Ticket Inspector while raising awareness among the passengers about ‘UTS’ app
Nashik News : मनमाडला रेल्वेच्या चाकात बिघाड; अनर्थ टळला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.