नाशिक : महापालिका शिक्षण विभागाकडून पहिली ते आठवी वर्गाच्या शिक्षकांसाठी ‘अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन’ या विषयावर १२ ते १६ डिसेंबरदरम्यान प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी बी. टी. पाटील यांनी दिली. (Training for NMC teachers from today nashik)
अध्यापन कौशल्यात काळानुरूप बदल करताना योग्य प्रकारच्या अध्ययन प्रक्रिया वर्गामध्ये कशा वापराव्यात याबाबतची कौशल्ये शिक्षकांनी आत्मसात करणे, कौशल्ये आत्मसात करून विद्यार्थ्यांना एकविसाव्या शतकासाठी तयार करण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुलांना एकतर्फी शिकवण्यापेक्षा ती स्वतःहून शिकतील, त्यांच्यामध्ये जिज्ञासू वृत्ती विकसित होईल. आव्हाने पेलण्यास-स्वीकारण्यास विद्यार्थी सक्षम बनतील, स्वतःहून शिकण्यास प्रेरित होतील, या दृष्टीने शिक्षकांनी नियोजन व व्यवस्थापन कसे करावे.
याबाबत माहिती देण्यासाठी या प्रशिक्षणाची रचना केलेली आहे. शिक्षण प्रणालीमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या व विद्यार्थ्यांचे अध्ययन अधिक परिणामकारक होण्याच्या दृष्टीने शिक्षकांचा व्यावसायिक विकास होणे आवश्यक आहे.
शिक्षकी व्यवसायाचा विचार करताना प्रामुख्याने मुलांच्या अध्ययनाची गती कशी वाढेल, मुले शिकण्यात पुढाकार कशी घेतील, शिकताना तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करतील व एकमेकांच्या सहकार्याने कशी शिकतील आदी बाबी जाणून घेणे गरजेचे असल्याचे शिक्षणाधिकारी पाटील यांनी माहिती दिली.
"प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांनी अध्यापनाची कौशल्ये आत्मसात करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात योगदान द्यावे. शालेय शिक्षणातून विद्यार्थी भविष्यासाठी तयार होणे आवश्यक आहे. जागतिक स्तरावर विविध क्षेत्रात होणारे आमूलाग्र बदल, नवनवीन संशोधनाचा विचार करता नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक यांना सक्षम करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी या प्रशिक्षणाची गरज आहे."
-बी. टी. पाटील, प्रशासनाधिकारी, शिक्षण विभाग, मनपा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.