Nashik ZP News : जि. प. सहाय्यक व कनिष्ठ प्रशासनातील फेल अधिकाऱ्यांना आजपासून प्रशिक्षण

Nashik ZP News
Nashik ZP News esakal
Updated on

Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासह तालुकानिहाय पंचायत समित्यांमधील कनिष्ठ प्रशासन अधिकारी व सहाय्यक प्रशासन अधिकारी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी मेमध्ये लेखी परीक्षा घेतली होती. यात तब्बल ४० टक्के अधिकारी ‘फेल’ झाले होते. (Training of fail Officers in Assistant and Junior Administration of zp from today nashik news)

त्यावर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी व सहाय्यक प्रशासन अधिकारी यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होण्यासाठी हे प्रशिक्षण असून, १७ व १८ ऑगस्टला प्रशिक्षण रावसाहेब थोरात सभागृहात दिले जाणार आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.

कळवण, दिंडोरी, सुरगाणा, इगतपुरी, सिन्नर यासह मालेगाव तालुक्यातील पंचायत समित्यांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी बैठका घेतल्या होत्या. यात, पंचायत समित्यांमधील कनिष्ठ प्रशासन अधिकारी व सहाय्यक प्रशासन अधिकारी यांचे कामकाज असमाधानकारक आढळून आले होते.

त्यावर, मित्तल यांनी १५ मेस मुख्यालयातील तसेच प्रत्येक पंचायत समितीतील कनिष्ठ व सहाय्यक प्रशासन अधिकारी यांची बैठक घेतली. बैठकीत अचानकपणे प्रशासकीय कामकाजाची अधिकाऱ्यांना किती माहिती आहे, हे जाणून घेण्यासाठी उपस्थित अधिकाऱ्यांची परीक्षा घेतली. यात १५ सहाय्यक प्रशासन अधिकारी, तर ३६ प्रशासन अधिकाऱ्यांनी ६० गुणांची परीक्षा दिली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik ZP News
Nashik ZP News : बदलीनंतरही भाऊसाहेबांना सोडवेना टेबल! जि. प. विभागाकडून अद्यापही अनेक कर्मचारी जागेवरच

त्यानंतर झालेल्या परीक्षा निकालात तब्बल ४० टक्के अधिकाऱ्यांना कमी गुण म्हणजे अगदी १० ते १५ दरम्यान गुण प्राप्त झाल्याने ते अनुत्तीर्ण ठरले होते. कमी गुण प्राप्त झालेल्या अशा ३० अधिकाऱ्यांना प्रशासनाने त्यावेळी नोटिसा बजावल्या होत्या.

नोटिसांमध्ये परीक्षेत कमी गुण प्राप्त झाले असल्याने मित्तल यांनी खुली नाराजी व्यक्त केली होती. त्यावर अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार गुरुवारी (ता. १७) व शुक्रवारी (ता. १८) हे प्रशिक्षण होत आहे.

असे असेल प्रशिक्षण

गुरुवारी (ता. १७) : सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारादरम्यान कनिष्ठ लेखाधिकारी प्रियंका कुलकर्णी या ‘निवृत्तिवेतन प्रकरणे’, कनिष्ठ प्रशासन अधिकारी भूषण भार्गवे हे ‘पंचायत राज सेवार्थ, अनुषंगिक कार्यवाही करणे, लेव्हल १ लेव्हल २’.

Nashik ZP News
NAFED Onion News : ‘नाफेड’चा कांदा इतर राज्यांत; डॉ. भारती पवार यांचा अधिकाऱ्यांशी संवाद

तर तीन ते सायंकाळी पाचदरम्यान कनिष्ठ प्रशासन अधिकारी शिवराम बोटे हे ‘सर्व रजेचे प्रकार व रजा नियम, बालसंगोपन रजा, सेवाप्रवेश नियमाच्या अनुषंगिक सर्व कामकाज पद्धती’बाबत प्रशिक्षण देतील.

शुक्रवारी (ता. १८) : सकाळी साडेदहा ते दुपारी बारादरम्यान कनिष्ठ प्रशासन अधिकारी अनिल दराडे हे ‘पत्रलेखन, टिपणी लेखन, सर्वसाधारण आदेश काढताना घ्यावयाची दक्षता, अनुकंपा प्रस्ताव व वैद्यकीय देयके’, बारा ते अडीचदरम्यान कनिष्ठ प्रशासन अधिकारी नितीन पवार हे ‘विभागीय खाते चौकशी प्रस्ताव तयार करण्याची कार्यपद्धती’, तीन ते चारदरम्यान कनिष्ठ प्रशासन अधिकारी चंद्रशेख पाटील ‘बिंदुनामावली, सेवाज्येष्ठता, पदोन्नती’, चार ते सायंकाळी पाचदरम्यान कनिष्ठ प्रशासन अधिकारी अनिल गिते हे ‘न्यायालयीन प्रकरणे कार्यपद्धती’ यासंदर्भात प्रशिक्षण देणार आहेत.

Nashik ZP News
Nashik ZP News : अभिलेख वर्गीकरणासाठी 2 दिवसांचा अल्टिमेटम; जि. प. इमारतीची मित्तल यांच्याकडून पाहणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.