नाशिक रोड : नाशिक शहरात औद्योगिक वसाहत असलेल्या सातपूर, अंबड, गोंदेगाव, तसेच सिन्नर येथे कामानिमित्त कंपनीमध्ये, तसेच इतर ठिकाणी काम करण्यासाठी आलेले परराज्यांतील नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत.
शाळेला सुटी आणि कंपनीला दिवाळी सुटी आहे. त्यामुळे आपल्या घरी दिवाळी साजरी करण्यासाठी राज्यात व परराज्यातील नागरिक जात असतात. नाशिक रोड रेल्वेस्थानकावर या नागरिकांची मोठी गर्दी आहे.
स्थानकावर जागा नसल्याने या नागरिकांना महिला, वयोवृद्ध, बालक यांच्यासमवेत थंडीत स्थानकाबाहेर गाडीचा प्रतीक्षा करीत बसावे लागत आहेत. तसेच गाड्या उशिरा आणि मध्यरात्री असल्याने प्रवाशांना स्थानकाबाहेर थांबण्याशिवाय पर्याय नाही.
सर्व गाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. गाडीमध्ये जागा मिळण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागत आहे. (Trains crowded with passengers On occasion of Diwali 14 additional trains to go out of village started nashik)
दिवाळी सुट्यांचा लाभ घेण्यासाठी पर्यटकांनी धार्मिक आणि पर्यटनस्थळांना पसंती दिल्याने सर्व गाड्या फुल आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने आतापर्यंत १४ गाड्या वाढीव सोडल्या आहेत.
सलग सुट्या असल्याने अनेक कर्मचारी व अधिकारी, तसेच कंपनी कामगार व व्यावसायिक गावी जात आहेत. त्यामुळे जम्मू-काश्मीर, अमृतसर, हरिद्वार आदी राज्यांकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या आताच फुल झाल्या आहेत.
दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये जाणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने रेल्वेने १४ वाढीव रेल्वेगाड्या सुरू केल्या असून, त्या आतापासूनच फुल होऊन धावू लागल्या आहे. तसेच तिरुपती बालाजीला जाणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असल्याने या मार्गावरील जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्यांचे आरक्षण बुक झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.