Rural Police Transfer: नाशिक ग्रामीण पोलीस दलात जम्बो बदल्या! तात्काळ हजर होण्याची पोलीस अधीक्षकांची तंबी

Transfers
Transfersesakal
Updated on

Rural Police Transfer : नाशिक ग्रामीण पोलीस दलात वर्षानुवर्षांपासून एकाच पोलीस ठाण्यात ठाण मांडून असणाऱ्यांसह सुमारे एक हजार पोलीस अंमलदारांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस अंमलदारांचे धाबे दणाणले असून, कही खुशी-कही गम असे चित्र आहे. दरम्यान, बदल्या करण्यात आलेल्या पोलीस अंमलदारांनी तात्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचीही तंबी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी दिली आहे.

तसेच, कोणत्याही कारणास्तव हजर होण्यास टाळाटाळ केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचाही इशारा अधीक्षकांनी दिला आहे. (transfer in Nashik rural police force warning of Superintendent of Police to appear immediately nashik news)

नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशान्वये, ग्रामीण पोलीस दलातील विविध आस्थापनांतील १ हजार ९१ पोलीस अंमलदारांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्य आहेत. पोलिस शिपाई ते सहायक पोलिस उपनिरीक्षकांच्या या बदल्या आहे.

या बदल्यांमध्ये १६ हवालदार, १३ पोलिस शिपाई, १३ सहायक उपनिरीक्षक, १८ चालक व ५ पोलिस नाईक यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. तर, १०० सहायक पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या झाल्या असून २८९ हवालदारांचाही बदलीत समावेश आहे.

यासह २५७ पोलिस नाईक आणि २७१ पोलिस शिपायांची बदली झाली आहे. त्याचप्रमाणे ७२ चालक अंमलदारांची बदली झाली आहे. या बदल्यामंध्ये १५३ महिला पोलिसांचाही समावेश आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Transfers
Officers Transfer: पोलीस आयुक्त शिंदे यांना बदलीचे वेध; पश्‍चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पदावर लक्ष्य?

अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस शिपाई ते सहायक उपनिरीक्षक दर्जाच्या पोलिसांच्या बदल्यांबाबत चर्चा सुरु होती. पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी बदल्यांचे आदेश देत अनेकांना अनपेक्षीत धक्का दिला आहे.

बदल्यांसाठी अनेकांनी घराजवळील पोलिस ठाणे मिळण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र नुकत्याच झालेल्या बदल्यांमध्ये १०२ अंमलदारांच्याच विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. तर अनेकांना आस्थापनांमधून पोलिस ठाण्यात बदली देण्यात आली आहे.

बदल्यांमध्ये जिल्हा विशेष शाखा, पोलिस मुख्यालय, नियंत्रण कक्ष, स्थानिक गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, श्वान पथक, महिला सुरक्षा, सीसीटीएनएस, सायबर, आरसीपी, एटीएस व वाहतूक शाखेतील पोलिसांचा समावेश आहे.

Transfers
Revenue Department Transfer : राज्यातील महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या बदल्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.