Nashik Police Transfer: अंबड पोलिस निरीक्षक वाघ यांची तडकाफडकी बदली; 10 महिन्यांत 5 अधिकाऱ्यांकडे पदभार

Transfer of Ambad Police Inspector pramod Wagh nashik news
Transfer of Ambad Police Inspector pramod Wagh nashik newsesakal
Updated on

Nashik Police Transfer : अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांची आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक अशोक नजन यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला.

दरम्यान, गेल्या दहा महिन्यांत अंबड पोलिस ठाण्यात पाच पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या असून, नजन हे सहावे अधिकारी आहेत. (Transfer of Ambad Police Inspector pramod Wagh nashik news)

मराठा आरक्षणासंदर्भात मंगळवारी (ता. ३१) आमदार सीमा हिरे यांच्या सिडकोतील कार्यालयास मराठा आंदोलकांनी टाळे ठोकून आंदोलन केले होते. या आंदोलनप्रसंगी श्री. वाघ घटनास्थळी उपस्थित होते.

परंतु, त्यानंतर तत्काळ आंदोलकांवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी वाघ यांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे. दरम्यान, वाघ यांच्या बदलीमुळे सिडकोतील काही नागरिकांनी अंबड पोलिस ठाणे गाठून बदलीला विरोध दर्शविला. त्यांची बदली रोखण्यासाठी पोलिस आयुक्तांचीही भेट घेणार असल्याचे समजते.

गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनात तत्कालीन पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्याविरोधातील तक्रारींचा पाढा आमदार नीतेश राणे यांनी वाचला आणि चौकशीची मागणी केली होती. त्यावरून जानेवारीत देशमुख यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली.

Transfer of Ambad Police Inspector pramod Wagh nashik news
Nashik: कारडा कन्स्ट्रक्शनचे मनोहर कारडा यांची धावत्या रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या; फसवणूकप्रकरणी होता गुन्हा दाखल

त्यानंतर नंदन बागडे यांच्याकडे पदभार दिला; परंतु अवघ्या तीन आठवड्यांत युवराज पत्की यांच्याकडे पदभार देण्यात आला. काही महिने होत नाहीत, तोच पुन्हा बदली करीत सूरज बिजली यांना नियुक्त केले. बिजली यांची काही महिन्यांतच पदोन्नतीने बदली झाल्याने प्रमोद वाघ यांच्याकडे जुलैमध्ये पदभार देण्यात आला. मात्र, अवघ्या चार महिन्यात त्यांची बदली करण्यात आली आहे.

आयुक्तांकडे तक्रारी

आमदार सीमा हिरे यांच्या सिडकोतील कार्यालयास मराठा आंदोलकांनी टाळे लावल्यानेच अंबडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांची बदली झाली, अशी चर्चा आहे. मात्र, पोलिस आयुक्तांकडे वाघ यांच्यासंदर्भात काही तक्रारी प्राप्त झाल्याचीही चर्चा आहे. तसेच, त्यांच्यासंदर्भात काही मोबाईल चित्रणही आयुक्तालयापर्यंत पोहोचल्यानेच वाघ यांची बदली झाल्याची चर्चा पोलिस वर्तुळात आहे.

Transfer of Ambad Police Inspector pramod Wagh nashik news
Nashik Drug Case: सोलापूरच्या कारखान्यात ड्रग्ज बनविणाऱ्यास पुण्यातून अटक; MD ड्रग्जप्रकरणात नाशिक गुन्हेशाखेची कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.