Police Transfer : राज्यातील पोलिस निरीक्षक पदावरील ४४९ अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदलांमध्ये नाशिक शहर पोलिस आयुक्तालयात नव्याने १६ तर नाशिक ग्रामीणमध्ये नऊ अधिकारी रुजू होणार आहेत.
तसेच नाशिक शहर आयुक्तालयातील अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांची सांगलीला तर शहर गुन्हे शाखेतील मध्यवर्ती शाखेचे डॉ. अंचल मुदगल यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली झाली आहे. (Transfer of four half hundred police inspectors in state 16 in commissionerate9 new officers in rural nashik news)
गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील पोलिस निरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांना बदल्यांची प्रतीक्षा होती अखेर विलंबनाने का होईना राज्यातील ४४९ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या शासनाच्या गृह विभागाने आज जाहीर केल्या.
या बदल्यांमध्ये नाशिक पोलिस आयुक्तालयात १६ निरीक्षक तर नाशिक ग्रामीण अधीक्षक कार्यालयात नऊ पोलिस निरीक्षक रुजू होणार आहेत. नाशिक शहर व ग्रामीणमधून १० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.
आयुक्तालयात रुजू होणारे
विद्यासागर श्रीमनवार, गजेंद्र पाटील, सुशीला कोल्हे, सुभाष भोये, दिवाण वसावे, भरतसिंग पराडके, शंकर खटके, सुभाष ढवळे, प्रमोद वाघ, सोहन माछरे, अशोक नजन, दिनेश शेंडे, नितीन पगार, जितेंद्र सपकाळे, तुषार अढावू, संतोष नरुटे हे नव्याने रुजू होतील तर विजय पगारे यांना मुदतवाढ देण्यात आली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
नाशिक ग्रामीणमध्ये रुजू होणारे
सत्यजित आमले, विनोद पाटील, रवींद्र मगर, प्रीतम चौधरी, रघुनाथ शेगर, प्रमोद पवार, दत्ता चौधरी, सोपान काकड, प्रशांत आहिरे
शहर-जिल्ह्यातून बाहेर जाणारे
डॉ अंचल मुदगल - एसीबी, सूरज बिजली- सांगली, वामन बांडेवाल - लातूर, एकनाथ पाडले - बुलडाणा, सुनील बच्छाव - गुन्हे अन्वेषण नाशिक, रामेश्वर गाडे - औरंगाबाद, दुर्गेश शेलार - एमपीए, माधवी चौधरी - एमपीए, माणिक पत्की - गुप्तवार्ता, सतीश घोटेकर - धुळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.