Nashik City Police News : शहर पोलिस आयुक्तालयात बदल्यांचे वारे

Police Transfer News
Police Transfer Newsesakal
Updated on

Nashik News : गेल्या आठवड्यात नाशिक ग्रामीण पोलिस दलातील पोलिस अंमलदाराच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे आता नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातही अंमलदारांमध्ये बदल्याचे वारे वाहू लागले आहेत.

आयुक्तालयाच्या प्रशासन विभागाला पूर्णवेळ उपायुक्त नसल्याने आयुक्तालय हद्दीतील बदल्या रखडल्या होत्या. आता नव्याने उपायुक्तांनी पदभार घेतल्याने आयुक्तालयात बदल्यांची कुजबूज सुरू झाली आहे.

दरम्यान, प्रशासन विभागाकडूनही एकाच ठिकाणी निर्धारित कालावधीपेक्षा अधिक वर्षे असलेल्या अंमलदाराच्या बदल्या केला जातात की जैसे थे परिस्थिती ठेवली जाते, याकडे अनेकांचे लक्ष आहे. (transfers in City Police Commissionerate As new deputy commissioner took charge Nashik News)

महाराष्ट्र पोलिस दलामध्ये गेल्या महिनाभरात बदल्यांचे सत्र सुरू आहे. गेल्या महिन्यात पोलिस आयुक्त तथा अधीक्षक आणि त्यानंतर उपायुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या, तर गेल्या आठवड्यात ४४९ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या. सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षकांना आता बदल्यांचे वेध लागले आहेत.

साधारणतः मेअखेरपर्यंत पोलिस अधिकाऱ्यांपासून ते अंमलदार पदापर्यंतच्या बदल्या होत असतात. मात्र या वेळी पोलिसांच्या बदल्यांना विलंब झाला. त्याचाच परिणाम, पोलिस अंमलदाराच्या बदल्यांनाही विलंब झाला. गेल्या आठवड्यात नाशिक ग्रामीण पोलिस दलांतर्गत सहायक उपनिरीक्षक ते पोलिस शिपाई पदावरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या पोलिस अधीक्षकांच्या आदेशान्वये करण्यात आल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Police Transfer News
Nashik News : शहरात तिघांची गळफास घेत आत्महत्या

या बदल्या करताना अधीक्षकांनी तत्काळ रुजू होण्याचीही तंबी दिली होती. आता, शहर पोलिस आयुक्तालयातील अंमलदारांमध्ये बदल्यांसंदर्भात कुजबूज सुरू झाली आहे. काही पोलिस कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी विनंती अर्ज केलेले आहेत. तर काहींनी मुदतवाढीसाठीही अर्ज प्रशासन विभागाकडे दिले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात होणाऱ्या बदल्या कशारीतीने होतात याकडे आयुक्तालयाचे लक्ष लागून आहे.

एकाच ठिकाणी असलेल्यांवर लक्ष?
पोलिस आयुक्तालयात १३ पोलिस ठाणे, सायबर पोलिस ठाणे, शहर गुन्हे शाखांचे तीन युनिट, आर्थिक गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, नियंत्रण कक्ष आणि मुख्यालयासह विविध पथकांमध्ये सुमारे तीन हजार पोलिस कर्मचारी आहेत. यात काही पोलिस अंमलदार हे एकापेक्षा अधिक निर्धारित काळापेक्षा अधिक वेळ एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. अशा पोलिस अंमलदाराच्या बदल्या होत नसल्याने अनेकदा याबाबत उलटसुलट चर्चा पोलिस वर्तुळात होत असतात.

Police Transfer News
Nashik News : ‘शामा’ला खंडोबाच्या चरणी नेत नवसपूर्ती; पानेवाडीचे पिंगट बंधून अश्‍वासह जेजुरीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.