Nashik PI Transfers : येथील नाशिक परीक्षेत्रातील विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर- पाटील यांनी २८ पोलिस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश शनिवारी (ता.१३) पारीत केले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोग व पोलिस महासंचालक यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निःशस्त्र पोलिस निरिक्षकांच्या या बदल्या केल्या आहेत. (Transfers of 28 PI in Nashik Constituency due to background of elections nashik news)
पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी काल (ता.१२) परिक्षेत्र पोलिस आस्थापना मंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत नाशिक परिक्षेत्र पोलिस आस्थापना मंडळाने पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांना मान्यता दिली. त्यानुसार नगर जिल्ह्यातील दहा, नाशिक ग्रामीणमधील दहा, जळगावचे पाच व धुळे जिल्ह्यातील तीन पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे.
बदली झालेल्या पोलिस निरीक्षकांचा तपशील असा (कंसात बदली झालेले ठिकाण)
सध्या नगरला नियुक्त असलेले सुहास चव्हाण (नंदुरबार), धनश्याम बळप (नाशिक ग्रामीण), मधुकर साळवे (जळगाव), हर्षवर्धन गवळी (धुळे), वासुदेव देसले (नंदुरबार), चंद्रशेखर यादव (धुळे). संजय सानप (नाशिक ग्रामीण), विलास पुजारी (नाशिक ग्रामीण), सोपान शिरसाठ (नाशिक ग्रामीण), शिवाजी डोईफोडे (नाशिक ग्रामीण) यांची बदली झाली आहे.
नाशिक ग्रामीणमधील खगेंद्र टेंभेकर (नगर), बाळासाहेब थोरात (धुळे), संदीप कोळी (नगर), समीर बारावकर (नगर), संदीप रणदिवे (जळगाव), समाधान नागरे (नगर), विकास देवरे (जळगाव), अरविंद जोंधळे (नंदुरबार), सुनील पाटील (जळगाव), सोपान काकड (नगर) यांची बदली झाली आहे.
जळगाव येथे नियुक्त असलेले राधाकृष्ण कुंभार (नगर), अरुण धनवडे (नाशिक ग्रामीण), राहुल खताळ (नाशिक ग्रामीण), कांतिलाल पाटील (धुळे), राजेंद्र पाटील (नाशिक ग्रामीण) यांच्यासह धुळ्यात नियुक्त नितीन देशमुख (नगर), आनंद कोकरे (नगर), सतीश घोटेकर (नगर) यांची बदली जाहीर झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.