येवला (जि. नाशिक) : शहरात राहणाऱ्या व युट्यूब (YouTube) चॅनेलवर जनजागृतीचे काम करणाऱ्या किन्नर महंताला युट्यूबवर लिंग व वर्णभेदी टिप्पणी, दमबाजी व शिवीगाळ करणाऱ्या बारामती येथील महिलेवर येथील शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशात तृतीयपंथी समुदायाच्या संरक्षणासाठी २०२० मध्ये पारित झालेला तृतीय पंथी अधिकार संरक्षण कायदा आल्यानंतर नाशिक परिक्षेत्रातील पहिलाच गुन्हा असून राज्यातीलही पहिलाच गुन्हा असल्याचे सांगितले जाते. (Transgender mahant threatened by woman on YouTube)
युट्यूब चैनलवर बारामतीतून दमबाजी
मनमाड येथील सागर पोपट शिंदे उर्फ किन्नर आखाडा महंत शिवलक्ष्मी संजय झाल्टे (रा.पारेगाव रोड,येवला) यांचे वर्षापूर्वी मातुलठाण येथील संजय झाल्टे यांच्यासोबत लग्न झालेले आहे. हे पती-पत्नी तसेच शिष्य शुभालक्ष्मी असे तिघेजण शहरातील पारेगाव रोड येथे राहतात. किन्नर शिवलक्ष्मी व पती झाल्टे यांनी युट्युबवर चॅनेल बनवले असून सागर मंथन नावाने मालिका चालवली आहे. यावर तृतीय पथीयांच्या समस्या व अडचणी तसेच हिंदू सनातन धर्मांचे प्रसारण व जनजागृती यावर व्हिडीओ व पोस्ट बनवून अपलोड करतात.
यूट्यूबवरचे त्यांचे व्हिडिओला बारामती येथील विजया बारामतीकर उर्फ ॲड.विजया रमेश गावडे (रा. साईली हिल, बारामती, जि. पुणे) यांनी गेल्या महिनाभरापासून शिवलक्ष्मी झाल्टे यांच्यावर वर्ण व लिंगभेदी टीका करत महंत शिवलक्ष्मी यांच्या व्हिडिओत छेडछाड करत बदनामी केली. शिवलक्ष्मी यांच्या जातीबद्दल अपशब्द वापरून त्यांची भावना दुखावून धमकी देखील दिल्याचे शिवलक्ष्मी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत २० एप्रिलला बारामती शहर पोलिस ठाण्यातही त्यांनी तक्रार दिली. त्यानंतरही यूट्यूब चैनलवरून बारामती येथून त्यांना पुन्हा दमबाजी करण्यात आली आहे.
यानंतर शहर पोलिस ठाण्यात किन्नर शिवलक्ष्मी झाल्टे यांनी बीड येथील निराधार सामाजिक संस्थेच्या सचिव सत्यभामा सौंदरमल आणि मालेगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या कल्याणी माळी यांची मदत घेऊन सोमवारी रात्री उशीरा शहर पोलिस ठाण्याला रीतसर फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण ट्रान्सजेंडर समुदायाला या कायद्याबद्दल माहिती होणार असल्याची भावना शिवलक्ष्मी संजय झाल्टे यांनी बोलताना व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.