Nashik News :Smart Cityच्या कामांमुळे मे पर्यंत वाहतूक मार्गात बदल

Nashik Smart City latest marathi news
Nashik Smart City latest marathi newsesakal
Updated on

नाशिक : स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत शहरभरात ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. बहुतांशी कामे अद्यापही प्रगतिपथावर असल्याने वाहतूक पोलिस शाखेने पुन्हा या मार्गावरील वाहतूक मार्गांच्या बदल्याची अधिसूचना जारी केली आहे.

नाशिक शहर स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये शहरात ठिकठिकाणी कामे सुरू असून, भूमिगत विद्युतवाहिन्या, मलवाहिन्या, जलवाहिन्यांची कामे सुरू आहेत. तर, रस्त्याची कामे पाच ते आठ टप्प्यांत होणार आहे. (Transport route changes till May due to Smart City works Nashik News)

Nashik Smart City latest marathi news
Nashik News : होळकर पुलावरील पादचारी मार्गाला भेगा

स्मार्ट सिटीच्या कामांसाठी मेपर्यंत वाहतूक मार्गांत बदलत्या सर्व रस्त्यांवर सकाळी आठ ते सायंकाळी सातपर्यंत वाहतुकीला मनाई असणार आहे. यासह रस्त्याच्या कामकाजानुसार वाहतुकीत वेळोवेळी बदल होतील, असे पोलिस वाहतूक उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे.

त्या रस्त्यांवर बॅरेकेटिंग करून, रात्री वाहनांना दिसेल असे एकेरी मार्ग, प्रवेश बंद, रिफ्लेक्टर फलक लावण्याचे आदेश दिले आहेत. यासह हे निर्बंध पोलिस, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दल व आपत्कालीन सेवेतील वाहनांनादेखील लागू असतील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच, यासाठी कंपनीकडून दोन-दोन वॉर्डन नियुक्त केले जाणार असल्याचेही या अधिसूचनेत म्हटले आहे.

सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

Nashik Smart City latest marathi news
Nashik News : लडाख- तिबेटमधील स्थलांतरित चक्रवाकचा मृत्यू; नांदूरमधमेश्‍वरमधील घटना

बदललेले वाहतुकीचे मार्ग

* प्रवेश बंद : चोपडा लॉन्स ते जुना गंगापूर नाका, केकाण रुग्णालय ते चोपडा लॉन्स

पर्यायी मार्ग : मॅरेथॉन चौकाकडून गंगापूर नाक्यावरून चोपडा लॉन्समार्गे पंचवटीकडे. चोपडा लॉन्स ते प्रमोद महाजन गार्डनसमोरुन मॅरेथॉन चौकाकडे मार्गस्थ.

* प्रवेश बंद : शनी चौक ते सरदार चौक (दुहेरी रस्ता)

पर्यायी मार्ग : शनी चौकातून कार्तिक स्वामी मंदिराकडे, शनी चौकातून गोराराम मंदिराकडे, सरदार चौकातून रामकुंड व गाडगे महाराज पुलाकडे.

* प्रवेश बंद : सुंदरनारायण मंदिर ते पंचवटी कारंजा

Nashik Smart City latest marathi news
Dhule News : गोवंश वाहतूक करणारा Pick up वडणेजवळ जप्त

पर्यायी मार्ग : परिस्थितीनुसार त्याच रस्त्यावरून वाहतूक.

* प्रवेश बंद : धात्रक कॉर्नर ते हॉटेल पंचवटी

पर्यायी मार्ग : मेहेर सिग्नल-अशोकस्तंभ-रविवार कारंजा, धात्रक कॉर्नर ते एम.जी. चौक, घनकर गल्ली ते अशोकस्तंभ ते रविवार कारंजा, सांगली बँक कॉर्नर ते धुमाळ पॉइंटमार्गे वाहतूक.

* प्रवेश बंद : भद्रकाली मंदिर ते जुनी तांबट लेन

पर्यायी मार्ग : भद्रकाली मंदिर ते बादशाही कॉर्नर, दूधबाजार ते बडी दर्गा, तिवंधा ते बडी दर्गामार्गे वाहतूक.

Nashik Smart City latest marathi news
Crime News : धक्कादायक घटना! महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर तिच्या मित्रासमोरच सामूहिक बलात्कार

* प्रवेश बंद : हॉटेल उत्तम पॅलेस ते इंद्रकुंड

पर्यायी मार्ग : निमाणी बस स्थानकमार्गे पंचवटी कारंजा

* प्रवेश बंद : स्वा. सावरकर तरण तलाव ते राजीव गांधी भवन

पर्यायी मार्ग : तरण तलाव ते मोडक सिग्नल मार्गे सीबीएस

* प्रवेश बंद : राजीव गांधी भवन सिग्नल ते पोलिस लाइन जलकुंभ

पर्यायी मार्ग : कुलकर्णी गार्डनमार्गे मॅरेथॉन चौकातून अशोक स्तंभमार्गे सीबीएस व इतरत्र.

Nashik Smart City latest marathi news
Nashik News : NMC क्षेत्रातील आस्थापनांच्या मराठी फलकसंदर्भात आवाहन!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.