नाशिकरोड : एक अल्पवयीन मुलगा पबजी (PUBG) खेळण्याच्या नादात रेल्वेने निघाल्याची माहिती नाशिकरोड रेल्वे पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी रेल्वेगाड्यांचा कसून शोध घेतला. अखेर मुंबईला जाणाऱ्या तपोवन एक्स्प्रेस (Tapovan Express) मधून त्याला ताब्यात घेतले. त्याला पालकांच्या स्वाधीन केले. मुलगा सुखरूप पाहून पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. (travelled directly from Nanded to Nashik while playing PUBG Nashik News)
अल्पवयीन मुलगा हरविल्याची तक्रार त्याचे वडील यांनी नांदेडच्या कंटूर पोलिस ठाण्यात दिली होती. त्याचे फोटो मिळवून नाशिक रोड रेल्वे पोलिसांनी आपल्या ग्रुपवर पाठविले. गाडीची वेळ झाली असल्याने पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी सहकाऱ्यांसह गस्त सुरू केली. गाडी नाशिक रोडच्या फलाट तीनवर आली असता, विजय कपिले यांनी गाडीची तपासणी केली. एका डब्यातून प्रवाशांसोबत लहान मुले उतरली. त्यातील एक मुलगा चेहरा लपवून चालला होता. त्यास हटकले असता, त्याने नातेवाईक स्थानकाबाहेर असल्याची माहिती दिली. या मुलाला नाव विचारल्यावर त्याने फक्त स्वतःचे नाव सांगितले. मुलाचे वडील त्याला नाशिकरोडला घेण्यास आले.
सदर मुलगा हा नांदेडला आत्याकडे राहत असताना 17 वर्षाच्या मुलाशी त्याची मैत्री झाली. त्याच्यामुळे मोबाईलवर गेम (Mobile Game) खेळण्याची सवय लागली. करणच्या पहिल्या आईचे निधन झाले असून, त्यास एक भाऊ आहे. दुसऱ्या आईला दोन मुले आहेत. आई- वडिलांकडून त्याला त्रास नाही. त्याला आई, वडील आणि इतर नातेवाईक खर्चाला पैसे देतात ते तो साठवून ठेवतो. मित्र दोन महिन्यापासून नाशिकला निघून गेला, तेथे शेतीचे काम करतो. त्याची दोन महिन्यात भेट झाली नाही म्हणून अल्पवयीन मुलाने त्यास भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मित्राने नाशिक रोडला आल्यावर भेटतो असे सांगितले. त्याच्याकडे साठवलेले 550 रुपये होते. त्यातून त्याने रावेर ते नरसी आणि नरसी ते नांदेडला पोचला. तेथे रेल्वे स्थानकापर्यंत आला मात्र, रेल्वेचे तिकीट मिळाले नाही म्हणून तपोवन गाडीत लपत छपत त्याने प्रवास केला. नाशिक रोडला पोचल्यावर करणचा शोध घेऊन त्याच्याकडे एक दिवस मुक्कामी जाणार होता. मात्र, तपासात पोलिसांना त्याचा असा कोणताही मित्र आढळला नाही.
पोलिसांनी त्याला रेल्वे प्रवासातील धोके, गुन्हेगारी याची माहिती दिल्यानंतर त्याने आपल्याला चांगला माणूस व्हायचं असून शिक्षण पूर्ण करणार असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.