अखेर आजी-आजोबांनी कोरोनाला हरविले! घरीच उपचार

grand parents
grand parentsesakal
Updated on

इंदिरानगर (नाशिक) : स्थानिक डॉक्टर, सामाजिक कार्यकर्त्यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे १९ स्कोअर असतानाही मुंबई नाका परिसरातील ८० वर्षीय त्र्यंबक गुप्ते आणि ७३ वर्षांच्या त्यांच्या पत्नी उषा गुप्ते यांनी घरीच उपचार घेत कोरोनावर यशस्वी मात केली. (senior-citizen-coron-free-without-hospital)

अखेर आजी-आजोबांनी कोरोनाला हरविले! घरीच उपचार

सुरवातीला किंचितसा ताप आला आणि तपासणीनंतर कोरोनाची बाधा झाल्याचे आणि ऑक्सिजन पातळी ८५ व स्कोअर १९ असल्याचे कळाल्यानंतर गुप्ते दांपत्य हादरले होते. त्यांचा मुलगा वैभव गुप्ते यांनी द्वारका मंडलाचे अध्यक्ष सुनील देसाई आणि डॉ. सुनील बाफना यांच्याशी संपर्क साधला. या दोघांनी त्यांना धीर दिला आणि डॉ. सागर मंडलिक यांनी त्यांच्यावर घरीच उपचार सुरु केले. औषधांना गुप्ते दांपत्य चांगली साथ देऊ लागले आणि हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसू लागली. काही दिवसांनी हे दांपत्य ठणठणीत बरे झाले. जिद्द आणि चिकाटी असेल तर कोरोनासारख्या महामारीवरही मात करता येते, हे गुप्ते दांपत्याने सिद्ध केले आहे. उपचारास प्रतिसाद दिल्यास कोणत्याही गंभीर आजाराला तुम्ही पळवून लावू शकता, असा संदेश गुप्ते दांपत्याने कोरोना रुग्णांना दिला आहे.

grand parents
...तरीही महापालिकेने मागविले पाच हजार इंजेक्शन?
grand parents
आता परीक्षा पुढे ढकलणे शक्‍य नाही : अमित देशमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.