ब्राम्हणपाडे रस्त्यावरील झाड कोसळून पडल्याने वाहतूक ठप्प

collapse tree on Brahmanpade road
collapse tree on Brahmanpade road esakal
Updated on

अंबासन (जि.नाशिक) : औरंगाबाद आहवा राज्य महामार्गावरील आसखेडा, ब्राम्हणपाडे रस्त्यावरील हनुमान मंदिरानजीक भर रस्त्यावर भलेमोठे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली असून सायंकाळपर्यंत संबंधित विभागाकडून कुठलीही दखल घेतली गेली नव्हती यामुळे वाहनचालकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. (tree collapse Aurangabad on Ahwa State Highway Brahmanpade road due to traffic jammed nashik news)

collapse tree on Brahmanpade road
collapse tree on Brahmanpade road esakal

महामार्गावरील अडथळा निर्माण करणारी झाडे वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असून सार्वजनिक बांधकाम विभाग सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वाहनचालकांकडून केला जात आहे. सोमवार (ता.२७) साडेतीन वाजेपासून परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतीशिवारात पाणीच पाणी साचले होते तर औरंगाबाद अहवा राज्य महामार्गावरील आसखेडा, ब्राह्मणपाडे रस्त्यावरील हनुमान मंदिराच्या नजीक बाभळीचे झाड रस्त्यावर कोसळून पडल्याने छोटी,मोठी वाहने ठप्प झाली होती.

collapse tree on Brahmanpade road
ताहाराबाद रस्त्यावर वाहतूक ठप्प; झाड कोसळल्याने वाहनचालक त्रस्त

दुचाकी स्वारांकडून अडचणींतून दुचाकी काढत मार्गस्थ होताना दिसून येत होते. मोठ्या वाहनचालकांची मात्र मोठी दमछाक उडाली होती. बहुतांश वाहने आनंदपुरहुन मोठा फेरा घेऊन आसखेडा मार्गे वळविण्यात आली होती. मात्र ज्या वाहनचालकांना रस्त्यावरील झाड कोसळून पडल्याची खबरबात नसल्याने पुन्हा त्यांना माघारी फिरावे लागत होते. रस्त्याच्या कडेला असलेली धोकादायक झाडे वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरू शकत असतांनाही संबधित विभागाकडून डोळेझाक केली जात असून धोकादायक ठरत असलेल्या झाडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

रस्त्यावर पाणीच पाणी

पावसाळ्यात रस्त्यावर पाणी वाहत असल्याने वाहनचालकांची दमछाक उडत आहे. साचलेल्या डबक्यातून वाहने काढताना मोठी कसरत करावी लागत असून रस्त्यावरील साईडपट्ट्यालगत गटारी दिसेनासी झाले आहेत. रस्त्याच्या काठावरील बहुतांश शेतक-यानी पाणी जाणा-या नाल्यावर अतिक्रमण केले असल्याने पाणी रस्त्यात साचत आहे. दरम्यान काकडगाव गावानजीक असलेल्ये फर्ची पुलावरून पाणी वाहून जात असून फर्चीपुल शोभेचे बाहुले बनले आहे याकडे संबंधित विभागाने लक्ष घालणे गरजेचे आहे.

collapse tree on Brahmanpade road
नाशिक : 3 दिवसात कोसळले 22 वृक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.