Tree Plantation : नाशिकच्या ‘देवराई’त 8 वर्षात जैवविविधता! 11 हजार रोप लावली

Nashik Devrai
Nashik Devraiesakal
Updated on

Tree Plantation : सातपूर परिसरातील फाशीचा डोंगर म्हणजे ओसाड रान. मात्र आठ वर्षांपूर्वी याच ठिकाणी ११ हजार रोपांची लागवड करण्यात आली आणि तेव्हाचे मृत जंगल आज जिवंत झाले आहे.

सुमारे ७० एकराच्या या परिसरात देवराई नुसती वाढली नाही तर नटली आहे. ११ हजार रोपांचे आज २५ हजार झाडांचे जंगल उभे राहिले असून, जैवविविधतेच्या दृष्टीनेही सक्षम झाले आहे. या देवराईला येत्या पर्यावरण दिनी आठ वर्षे होत आहेत. (Tree Plantation Biodiversity in Nashik's Devrai in 8 years 11 thousand saplings planted nashik news)

शहरांमध्ये वाढते प्रदूषण आणि वाढत्या सिमेंटच्या इमारतींमुळे शहरालगतच्या जैवविविधतेवर विपरीत परिणाम होणारच. नैसर्गिक सुबत्ता असलेल्या नाशिक शहराचे रुंदीकरण होऊ लागले. त्यामुळे झाडांची संख्या झपाट्याने कमी झाली. परिणामी शहराच्या उष्माकांमध्ये गेल्या काही वर्षात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

असे असले तरी पर्यावरणाची नाळ जोडलेल्या शेखर गायकवाड या उमद्या तरुणाने शहरालगतच असलेल्या सातपूर शिवारातील फाशीचा डोंगर हा ओसाड भूभाग वनराईसाठी निवडला. अर्थातच वन विभाग (पश्‍चिम) व त्यांची आपलं पर्यावरण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण दिनी ५ जून २०१५ मध्ये ‘नाशिक देवराई’साठी पावले टाकली.

त्यावेळी घेण्यात आलेल्या लोकसहभागातून वन महोत्सवामध्ये या देवराईमध्ये एकाच दिवशी ११ हजार रोपाची लागवड करण्यात आली. प्रारंभी ४० एकर जागेत हे वृक्षारोपण करण्यात आले. पावसाळ्यात नेहमीच रोपांची लागवड केली जाते.

शासनाकडून विशेष उपक्रम राबविले जातात. परंतु, लागवड केलेल्या रोपांची निगा वा देखभाल होत नाही. परंतु असे विशेष उपक्रम आत्तापर्यंत फसले. अपवाद देवराईचा.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik Devrai
Nashik News : दहेगावच्या पाण्याला आता माणिकपुंजचा टेकू; शेवाळयुक्त पाण्यामुळे आरोग्य धोक्यात

आठ वर्षांनंतर

आठ वर्षांनंतर देवराईत ११ हजारपेक्षा कमी नव्हे तर २५ हजार झाडे आहेत. या देवराईचे घनदाट जंगल ६५ ते ७० एकरात विस्तारलेले आहे. ‘मृत जंगल जिवंत करायचंय’ या एकाच उद्देशाने शेखर गायकवाड यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.

आठवड्याच्या दर शनिवारी, रविवारी ते स्वत: आणि त्यांच्या समवेत पर्यावरणप्रेमी या ठिकाणी जमतात. झाडांना पाणी घालतात. जंगलाचे संवर्धन करण्यासाठी जे काही करता येईल ते सर्व याठिकाणी केले जाते. त्यांच्या या अथक परिश्रमामुळे हे जंगल जैवविविधतेने नटले आहे.

आता आमराई...

येत्या पर्यावरण दिनी अर्थात येत्या ५ जूनला नाशिक देवराईला आठ वर्षे होत आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर ही देवराई पाहण्यासाठी नाशिककरांनी आवर्जून हजेरी लावावी असे आवाहन आपलं पर्यावरण संस्थेतर्फे शेखर गायकवाड यांनी केले आहे.

त्याशिवाय, नवीन संकल्पही आहे. तो आहे, याठिकाणी आमराईचा. गावरान आंब्याची लागवड करून आमराई निर्मिती करण्याचा संकल्प यंदा केला जाणार आहे. तरी नाशिककरांनी या आमराईसाठी आपलं योगदान द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Nashik Devrai
SSC HSC Exam Result: ‘आयएसई’, ‘आयसीएसई’मध्ये विद्यार्थी चमकले! शाळांचा शंभर टक्‍के निकाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()