Onion Seed Production : कसमादे कांद्याचे आगर म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यातील या भागातील कांद्याला जागतिक स्तरावर मागणी असते. मागील काही वर्षात या भागातील शेतकऱ्यांचा कांदा पिकाकडे ओढा वाढला आहे.
त्यामुळे येथील कांदा बी ला मोठी मागणी लक्ष्यात घेत घरीच कांदाबीज उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. (Trend of farmers towards onion seed production at home nashik news)
मागील तीन ते चार वर्षात अस्मानी संकटे एकापाठोपाठ येत आहेत. कधी अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट यामुळे शेतीचे अर्थकारण बिघडले आहे. नैसर्गिक संकटांमुळे कांद्याच्या बियाण्याची कमतरता भासल्याने व कंपनीची बियाणे महागडी दराने खरेदी करावी लागत असल्याने येथील कांदा उत्पादकांनी पारंपरिक पद्धतीने डोंगळयाचे उत्पादन घेऊ लागले आहेत.
कसमादे भागातील अनेक शेतकरी आपल्याला लागेल एवढे कांदा बियाणे उत्पादन करतात तर अनेक शेतकरी कांदा बीजोत्पादनातील व्यावसायिक शेतीत उतरले आहेत. यावर्षी अवकाळी पाऊस झालेल्या भागात खराब हवामानाने अनेक शेतकऱ्यांचे डोंगळे खराब झाले आहेत.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
तर अनेकांनी महागड्या फवारणी करून डोंगळे वाचवले आहेत. महागडे कांदा रोप खरेदी करण्यापेक्षा आपल्या कडील चांगल्या प्रतीच्या कांद्याची प्रतवारी करून अशा कांद्याची लागवड करून शेतकरी डोंगळे घेऊ लागले आहेत.
त्यामुळे जागेवरच रोप मिळत असल्याने आणि फसवणूक होणार नसल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकरी पारंपरिक पद्धतीने डोंगळयाचे उत्पादन घेऊ लागले आहेत.
"अनेक वर्षापासून आम्ही कांदा बीजोत्पादन घेत आहोत. नव्वद ते शंभर दिवसात दर्जेदार उत्पादन मिळत आहे." -सागर बच्छाव, कांदाबीज उत्पादक.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.