Nashik News : Parking Slot सुरू करण्यास MNCला नकार
नाशिक : शहरात सर्वाधिक गंभीर समस्या असलेल्या पार्किंगचा तिढा अद्यापही सुटता सुटत नसताना पार्किंग लॉटसच्या माध्यमातून व्यवस्थापन करण्यास ट्रायजेन कंपनी व्यवस्थापनाने अटी व शर्ती मान्य करूनही महापालिकेला नकार दिला आहे. (Triagen company management refused mnc for parking slot management nashik news)
अटी व शर्ती मंजूर करूनही पार्किंग स्लॉट चालविण्यास घेतलेल्या ट्रायजेन कंपनीने थेट नकार दिला आहे. नाशिक म्युनिसिपल स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन कंपनीकडून पीपीपी तत्त्वावर स्मार्ट पार्किंग प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
यात २८ ऑन स्ट्रीट, तर पाच ऑफ स्ट्रीट अशा ३३ ठिकाणी पार्किंग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पार्किंग स्लॉट तयार करण्याबरोबरच व्यवस्थापन करण्याचे काम दिल्ली येथील ट्रायजेन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे सोपविण्यात आले.
मात्र, कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने पार्किंग मधून फी वसुली करता आली नाही. कोरोना तिसरी लाट ओसरल्यानंतर ट्रायजेन कंपनीला पार्किंग स्लॉट सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?
मात्र, कोरोनामुळे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करत दरवर्षी दिल्या जाणाऱ्या रॉयल्टीत सतरा लाख रुपयांची सूट देण्याची मागणी कंपनीकडून करण्यात आली. त्याचबरोबर दुचाकींसाठी पाचऐवजी पंधरा, तर चारचाकीसाठी दहा रुपयांऐवजी ३० रुपये प्रतितास शुल्क वाढ द्यावी. तसेच, तीन वर्षांची मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली.
त्याचबरोबर उत्पन्न अधिक वाढावे म्हणून टोइंग सुविधा सुरू करण्याचीदेखील मागणी करण्यात आली. महापालिकेने टोइंगसह दीड वर्षे मुदतवाढ देण्याचे मान्य केले. महापालिका व ट्रायजेन कंपनी अधिकाऱ्यांमध्ये बैठक होऊनही तोडगा न निघाल्याने अखेर कंपनीने पार्किंग स्लॉट चालविण्यास नकार दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.