Vande Bharat Railway Trial : वंदे भारत रेल्वेची ट्रायल; कसारा ते इगतपुरी अंतर 22 मिनिटात पूर्ण

Officials and staff taking a trial of the Vande Bharat train at the station.
Officials and staff taking a trial of the Vande Bharat train at the station.esakal
Updated on

नाशिक रोड : मुंबई ते इगतपुरी आणि इगतपुरी ते मुंबई अशी वंदे भारत ट्रेनची आज ट्रायल घेण्यात आली. मुंबई ते साईनगर शिर्डी अशी नवीन रेल्वेला १० फेब्रुवारीला सुरवात होत आहे. यासाठी रेल्वेच्या आरडीएसओ या रिसर्च एजन्सीने घाट सेक्शनमध्ये कसारा ते इगतपुरी आणि इगतपुरी ते कसारा येथे ट्रायल घेतली.

मुंबईपासून इगतपुरीपर्यंत ही नवीन गाडी चालवण्यात आली. दुपारी पावणेतीनला कसाऱ्यावरून ही गाडी निघाली व सव्वातीनला इगतपुरीला पोहोचली. (Trial of Vande Bharat Railwal Kasara to Igatpuri distance completed in 22 minutes nashik news)

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

Officials and staff taking a trial of the Vande Bharat train at the station.
Cleanliness Drive : एकाच दिवशी 38 आरोग्य संस्थांत स्वच्छता मोहीम

विशेष करून घाट सेक्शनमध्ये ही गाडी चढउतार करते की नाही हे पाहण्यात आले. यासाठी रेल्वेच्या आरडीएसओ लखनऊ येथील अधिकारी उपस्थित होते. कसारा ते इगतपुरी दरम्यान ही गाडी अवघ्या २२ मिनिटात मार्गक्रमण करते.

अपेक्षेपेक्षा ही गाडी तीन ते चार मिनिटे लवकर पोहोचत असून विनाअडथळे ही गाडी मार्गक्रमण करत असल्याचा निष्कर्ष अधिकाऱ्यांनी काढला आहे. इगतपुरी रेल्वे स्थानकावर या गाडीचे स्वागत करण्यात आले.

येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या गाडीची रचना जाणून घेतली. आतून आणि बाहेरून ही गाडी इतर गाड्यांपेक्षा वेगळ्या रचनेची असल्याचा निर्वाळा अधिकाऱ्यांनी दिला.

"वंदे भारत या रेल्वेगाडीची ट्रायल करण्यात आलेली असून घाटात ही गाडी चालवून पाहण्यात आली आहे. यासाठी आरडीएसओ लखनऊ येथील अधिकारी वर्ग उपस्थित होते, त्यांच्या निरीक्षणाखाली ही गाडी चालवण्यात आली. कोणताही अडथळा आला नाही."

- ए. पी. राजपूत, अभियंता, इगतपुरी.

Officials and staff taking a trial of the Vande Bharat train at the station.
Nashik News : ZP कर्मचारी महासंघ जुन्या पेन्शनसाठी आक्रमक! बेमुदत संघर्षांच्या पावित्रा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.