Nashik News : आदिम कातकरी लाभार्थ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध : आदिवासी आयुक्त नयना गुंडे

बॉश इंडिया फाउंडेशन आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक यांच्या वतीने जिल्ह्यातील आदिम कातकरी कुटुंबीयांना ताडपत्री वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
Commissioner of Tribal Development Department Nayana Gunde, Project Officer Jitin Rahman distributing tarpaulins to tribal beneficiaries
Commissioner of Tribal Development Department Nayana Gunde, Project Officer Jitin Rahman distributing tarpaulins to tribal beneficiariesesakal
Updated on

नाशिक : जिल्ह्यातील आदिम कातकरी लाभार्थ्यांच्या विकासासाठी वेळ पडल्यास चौकटीबाहेर जाऊन विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडमधून मदत करण्यासाठी आदिवासी विकास विभाग कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांनी केले. (Tribal Commissioner Nayana Gunde statement Committed to development of Adim Katkari beneficiaries Nashik News)

बॉश इंडिया फाउंडेशन आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक यांच्या वतीने जिल्ह्यातील आदिम कातकरी कुटुंबीयांना ताडपत्री वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

प्रकल्प अधिकारी जितीन रेहमान, बॉश इंडिया फाउंडेशनचे वरिष्ठ सर्वसाधारण व्यवस्थापक श्रीकांत चव्हाण, सहायक प्रकल्प अधिकारी केतन पवार, कार्यालय अधिक्षक तुषार पाटील, लिपिक प्रणिता आंबरे, बॉशचे सहायक कार्यक्रम व्यवस्थापक स्नेहा जंगम आदी उपस्थित होते.

आयुक्त गुंडे पुढे म्हणाल्या की, आदिवासी विकास विभागाचा आदिम कातकरी समाजासाठी असलेल्या आराखड्या व्यतिरिक्त बॉश कंपनीने हे काम केले आहे. यापुढे देखील आदिवासी विभाग कंपन्यांच्या सीएसआर फंडचा वापर करून कातकरी समाजाच्या विकासासाठी काम करत राहील.

Commissioner of Tribal Development Department Nayana Gunde, Project Officer Jitin Rahman distributing tarpaulins to tribal beneficiaries
Nashik News : शालेय पोषण आहारात अधिक पूरक घटक समाविष्ट करण्यात येणार

जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबक आणि पेठ तालुक्यामध्ये आदिवासी निरिक्षकांना कातकरी समाजाची लोक कुडाच्या घरात राहत असल्याचे निदर्शनास राहत असल्याचे निदर्शनास आले होते. तत्काळ त्यांना पंतप्रधान आवास योजना, आदिम आवास योजना आणि शबरी आवास योजनेंतर्गत घरकुल देण्याचे निर्देश देण्यात आले होते.

शबरी घरकुल योजनेंतर्गत लाभार्थी पात्र असून घरकुल बांधण्यास काही महिन्यांचा विलंब लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तात्पुरती त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था म्हणून बॉश इंडिया फाउंडेशनने विलंब न करता १५० लाभार्थ्यांना ताडपत्री देण्याचे कबूल केले.

त्यापैकी प्रातिनिधीक म्हणून आपण ३० लोकांना वाटप करत असल्याचे आयुक्त गुंडे यांनी सांगितले. यावेळी प्रकल्प अधिकारी जितीन रहमान यांनी प्रास्ताविकात योजनांच्या अंमलबजावणीची माहिती दिली.

Commissioner of Tribal Development Department Nayana Gunde, Project Officer Jitin Rahman distributing tarpaulins to tribal beneficiaries
Gharkul Scheme News: सव्वा लाखांत घर बांधण्याची कसरत; बांधकामासाठी लागणारे साहित्य महागल्याचा परिणाम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.