Nashik : हॅलो, मला शबरी घरकुल योजनेची माहिती हवी आहे; आदिवासी विकासमंत्रीच असा कॉल करतात तेव्हा...

Vijaykumar Gavit
Vijaykumar Gavitesakal
Updated on

Nashik News : मुंबई मंत्रालयातील आपल्या दालनातून राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित हे आपल्याच आदिवासी विकास आयुक्त विभागात सुरू केलेला टोल फ्री हेल्पलाइन नंबर स्वतःच डायल करतात.

आपण कोण बोलतोय हे न सांगता शबरी घरकुल योजनेबाबत माहिती हवी आहे. (tribal development minister vijaykumar gavit test information about shabari Gharkul Yojana by making call nashik news)

याची माहिती मिळेल का? असे बोलून हेल्पलाइनवर बसलेल्या आपल्याच एका कर्मचाऱ्याची परीक्षा घेतली.

तर समोरूनच अत्यंत नम्रपणे आणि विनयशील स्वरात आपण कोण बोलत आहात, अन कुठून बोलत आहात, असे विचारून ठक्कर बाप्पा घरकुल योजनेची सविस्तरपणे माहिती दिली. त्यामुळे ती महिला कर्मचारी मंत्र्यांनी ‘अनाहूत’ पणे घेतलेल्या परीक्षेत पास झाल्या.

मंत्रालयातून एक फोन कॉल सेंटरला लावला जातो. आदिवासी विकास मंत्री डॉ गावित स्वतः नंबर फिरवतात आणि विचारणा करतात की आदिवासी विकास विभागातर्फे सुरू असलेल्या शबरी घरकुल योजनेची माहिती देता येईल का?

पलीकडून एक महिला कर्मचारी नम्र आणि आश्वासक स्वरात विचारणा करते की कोण बोलत आहे? पत्ता काय? अर्थातच आदिवासी मंत्री गावित आपले नाव न सांगता, एका स्वीय सहाय्यकाचे नाव आणि पत्ता सांगतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Vijaykumar Gavit
Vande Bharat Express: ‘वंदेभारत’ मुळे टॅक्सी, रिक्षांचा रोजगार वाढला! भाविकांची पर्यटनस्थळी वर्दळ

योजनेची सारी माहिती पलीकडून पटापट दिली जाते. मंत्री डॉ. गावित यांनीच काही दिवसापूर्वी या हेल्पलाईनचे उद्घघाटन नाशिक येथे कार्यक्रमात केले होते. पण तो क्रमांक खरोखरीच कसा चालतो याची माहिती त्यांना प्रत्यक्ष घ्यायची होती. प्रत्यक्षात योग्य माहिती देणारी ऑपरेटर महिला कर्मचारी माहिती द्यायला सुरवात करते.

आपण कोणाशी बोलत आहोत, याची पुसटशीही कल्पना हेल्पलाइनवर माहिती देणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्याला नव्हती. हा अनुभव म्हणजे मंत्री डॉ. गावित तसेच मंत्री दालनात बसलेल्या अधिकाऱ्यांना, अभ्यागतांना सुखद धक्का असतो.

हेल्पलाईनचा नंबर नव्याने सुरू

18002670007 हा आदिवासी विकास विभागाच्या हेल्पलाईनचा नंबर नव्याने सुरू केला आहे. या हेल्पलाइनचा कंट्रोल रूम नाशिक आदिवासी विकास आयुक्तालय (नाशिक) येथे राहणार आहे.

आदिवासी विभागाच्या योजना आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करायची आहे, याची सविस्तर माहिती या क्रमांकावर मिळते.

Vijaykumar Gavit
Police Transfer: राज्यातील साडेचारशे पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; आयुक्तालयात 16, ग्रामीणमध्ये 9 नवीन अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.