आदिवासीच्या कार्यकारी अभियंत्याला 29 लाखांची लाच घेताना अटक

Bribe Crime News
Bribe Crime Newsesakal
Updated on

नाशिक : नाशिकच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी लाच घेताना अटक केल्यानंतर अवघ्या 24 तासात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आदिवासी विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला तब्बल 28 लाख 80 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे.

तर दुसऱ्या घटनेत दिंडोरीत सर्कलला दहा हजार रुपयांची लाच घेताना अटक केल्याची तिसरी घटना गेल्या 24 तासात घडली आहे. (Tribal executive engineer arrested for accepting bribe of 29 lakhs Nashik Crime latest marathi news)

आदिवासी विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता असलेले दिनेशकुमार बागुल असे या लाचखोराचे नाव आहे. अडीच कोटी रुपयांच्या सेंट्रल किचन संदर्भातील कंत्राट देण्यावरून बागुल यांनी संबंधित कंत्राटदाराकडे लाचेची मागणी केली होती.

कंत्राटदारांने या संदर्भात नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. कंत्राटदार 28 लाख 80 हजार रुपयांची लाच देण्यासाठी बागुल यांच्या तिडके कॉलनीतील नयनतारा बिल्डिंगमधील निवासस्थानी गेले होते त्यावेळी दबा धरून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सदरची कारवाई करीत बागुल यांना लाचेची रक्कम स्वीकारताना अटक केली.

Bribe Crime News
Nashik : 'SMBT'त वळताय परदेशी विद्यार्थ्यांची पावले

तर दुसऱ्या घटनेत दिंडोरी तहसील कार्यालयातील मंडल अधिकारी कमरुद्दिन गुलाम अहमद सय्यद यास दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. लाचखोर सय्यद यांनी तक्रारदाराच्या शेत जमिनीच्या सातबारावर नाव समाविष्ट करण्यासंदर्भात दहा हजार रुपयांची मागणी केली होती.

Bribe Crime News
नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()