'दिवसभर वणवण केल्यावर मिळत्यात गोणीभर गोव-या’ : आदिवासींची व्यथा

Adivasi
Adivasiesakal
Updated on

पंचवटी (जि. नाशिक) : भाऊ, दिवसभर रानावनात वणवण केल्यावर एखादी गोणी गोवऱ्या मिळतात. त्या वर्षभर जपत होळीला विक्री करून त्यातून पोटाची खळगी भरतो. मात्र, आता ग्रामीण भागातील पशुधन ( Livestock) घटल्याने जगणे अवघड बनले आहे, अशी खंत गंगाघाटावर मोठ्या संख्येने दाखल झालेल्या गोवऱ्या विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

Adivasi
पगारच कमी म्हटल्यावर गड्यानं ऑफिसमध्येच थाटला संसार...

येत्या गुरुवारी (ता. १७) होळी असून त्यासाठी त्र्यंबकेश्‍वर (Trambakeshwar), पेठ (Peth) तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर गोवऱ्या विक्रेते दाखल झाले आहेत. शिमग्याला दोन दिवस शिल्लक असल्याने अद्यापही ग्राहक फिरकत नसल्याचे दिसून आले. या वेळी या विक्रेत्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी पूर्वीपेक्षा पशुधन निम्म्यापेक्षा अधिक संख्येने घटल्याने शेणासह रानशेणी गोवऱ्या मिळणे दुरापास्त झाल्याचे सांगितले. सध्या तीन ते चार रुपयाला थापलेल्या गोवऱ्या उपलब्ध आहेत, तर पोतभर रानशेणी गोवऱ्या दीडशे ते दोनशे रूपयांत उपलब्ध होत आहेत. होळीसाठी आदिवासी ( Tribal) भागातून अनेक विक्रेते सहकुटुंब गंगाघाटावरील मरिमाता पटांगणावर दाखल झालेले आहेत. त्यांच्याकडे शिधाही असून, सकाळ सायंकाळ ते त्या ठिकाणीच स्वयंपाक करून राहतात. काही भुरट्या चोरट्यांकडून त्रास दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. वर्षभर गोळा केलेल्या गोवऱ्यांना योग्य मोल मिळावे, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त करत काही ग्राहक अतिशय कमी किमतीत गोवऱ्या मागतात, अशी खंतही काही महिलांनी व्यक्त केली. गत वीस पंचवीस वर्षांपासून सहकुटुंब हाच व्यवसाय करतो, अशी माहिती त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील हरिझाखड येथील विष्णू डगळे यांनी दिली.

Adivasi
डॉक्टरला मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा; न्यायदंडाधिकारी

बिबट्याची दहशत

गोवऱ्या गोळा करण्यासाठी मुलाबाळांसह रानावनात भटकंती करावी लागते. मात्र सध्या इगतपुरीसह त्र्यंबकेश्‍वर, पेठ, हरसूल भागात बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे गोवऱ्या गोळा करताना जीव मुठीत धरूनच फिरावे लागते. बिबट्याच्या वावरामुळे मोठ्या प्रमाणात झाडी असलेल्या ठिकाणी जाणे टाळतो, असे अनेक विक्रेत्यांनी सांगितले. गोवऱ्या गोळा करताना वडिलांवर बिबट्याने हल्ला चढविला, परंतु त्यांच्या हातात मोठी काठी असल्याने बिबट्याने धूम ठोकल्याची माहिती एका विक्रेत्याने दिल

गोवऱ्या थापण्यापासून रानशेणी गोवऱ्या गोळा करण्यासाठी दिवसभर भटकंती करावी लागते. तेव्हा कुठे गोणीभर गोवऱ्या गोळा होतात. होळीला दोन दिवस बाकी असल्याने अद्याप ग्राहक नाही.

- सुमन गोटे, गोवऱ्या विक्रेते, कळमुस्ता (ता. त्र्यंबकेश्‍वर).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.