Nashik News : शहरात Triple Seat स्वार सुसाट; वाहतूक शाखेचा अघोषित परवाना?

Tripal Seat Travalling News
Tripal Seat Travalling Newsesakal
Updated on

Nashik News : शहरात भरधाव वेगात दुचाकी ‘राइड’ करणाऱ्यांनी उच्छाद मांडलेला असताना, त्यात भर ट्रीपल सीट दुचाकी हाकणाऱ्यांचीही पडली आहे.

वाहतूक सिग्नल वाहतूक पोलिस असतानाही त्यांच्या नाकावर टिच्चून ट्रीपल सीट दुचाक्या भरधाव वेगात चालवत असल्याचे चित्र सातत्याने नजरेला दिसते.(Triple seater in city brake traffic rules Ignoring Unruly Youth Unannounced License of Traffic Branch Nashik News)

परंतु वाहतूक पोलिस शाखेचे याकडे सोयिस्कर दुर्लक्ष केले असून, जणू या शहरात ट्रीपल सीट दुचाकी चालविण्यास परवानाच दिला की काय, अशी शंका व्यक्त होते आहे. यातूनच गंभीर स्वरूपाचे अपघात होऊन हकनाक बळीही जात आहेत. याबाबत वाहतूक शाखेकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने बेशिस्त ट्रीपल सीट चालकांनी मुजोरी वाढते आहे.

शाळा-महाविद्यालये नियमित सुरू झाली आहेत. त्यामुळे रस्त्याने मोपेड व दुचाक्यांवरून तरुणाई जाताना दिसते. परंतु बहुतांशी वेळा हे विद्यार्थी एकाच वाहनावरून तिघे-तिघे जाताना दिसतात.

दुचाकी वा मोपेडवरून प्रवास करणाऱ्या दोघांना हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. मात्र दुचाकी चालविणाराच हेल्मेट वापरत नाही. त्यामुळे एकाच दुचाकीवर तिघे असतील तर त्यांच्यातील चालकाकडेही हेल्मेट नसते. अशावेळी अपघातासारखी दुर्दैवी घटना घडल्यास तिघांच्या जिवाला धोका निर्माण होण्याचीच शक्यता अधिक असते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत ट्रीपल सीट दुचाक्या चालविणाऱ्या या तरुणाईकडे वाहतूक पोलिस शाखेनेही दुर्लक्ष केले आहे.

Tripal Seat Travalling News
Nashik Crime News : नाशिकरोडला अवैध धंदे वाढले

शहराचे माजी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, विश्‍वास नांगरे-पाटील, दीपक पांडे यांनी शहरातील दुचाकी अपघातांच्या प्रमाणात घट व्हावी यासाठी सातत्याने उपक्रम राबवितानाच दंडात्मक कारवाई केली होती.

दीपक पांडे यांनी तर शहरातील पेट्रोल पंपांवरच हेल्मेट असल्याशिवाय पेट्रोल न देण्याचे फर्मान काढले होते.

त्यामुळे दुचाकीचालकांना हेल्मेटचा वापर करावा लागत होता. विनाहेल्मेट कारवाई आजही होते, परंतु दंडात्मक वसुलीचा उद्देशापोटीच ती कारवाई होते. तर, बेशिस्त दुचाकी व चारचाकी वाहनचालकांचे परवानेही रद्द करण्याचीही कारवाईही शहरात झाली होती.

मात्र त्याचवेळी वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करणाऱ्या ट्रीपल सीट चालकांविरोधात कोणतीही कारवाई होत नसल्याने अशा बेशिस्त चालकांची मुजोरी वाढली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Tripal Seat Travalling News
Nashik Crime News : ऍसिड हल्ल्यातील जखमी तरुणाचा मृत्यू; खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

तरुणांचे प्रमाण लक्षणीय

शहरातील बहुतांशी सिग्नलवर वाहतूक पोलिसांची नियुक्ती असते. मात्र या पोलिसांचे लक्ष सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंगचे उल्लंघन, ट्रीपल सीट यापेक्षा फक्त विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे याकडेच अधिक असते. त्यामुळे शहरातील अनेक मुख्य चौकासह थेट महामार्गावरही सर्रास ट्रिपल सीट दुचाकीस्वार सुसाटपणे दुचाक्या हाकतात.

निर्ढावलेले काहीजण थेट शहरात पोलिसांच्या नाकावर टिच्चून गर्दीतून ट्रिपल सीट दुचाकी चालवत नेतात. विशेष म्हणजे या बाईकस्वारांकडे ना हेल्मेट ना संयम. गर्दीच्या सिग्नलवरही ट्रिपल सीट राइडर भरधाव वेगाने वाहने चालवितात. यातही प्रामुख्याने महाविद्यालयीन तरुणांचे प्रमाण लक्षणीय दिसून येत असून, त्यांच्याकडे वाहनपरवाना असतोच असेही नाही.

पालकांची जबाबदारी

पाल्य महाविद्यालयात जात असल्याने पालक गरजेपोटी वा हौसेने मोपेड वा स्पोर्ट्स बाईक घेऊन देतात. मात्र त्याचवेळी आपल्या पाल्याकडे परवाना आहे का, याचा मात्र विसर पडतो. तसेच, पाल्याला हेल्मेट सक्तीने वापरण्यास सांगितले जात नाही. विशेषत: मुली हेल्मेट वापरण्यास टाळाटाळ करतात. मात्र, आपल्या पाल्यास वाहतूक नियमांचे पालन करण्यास लावणे ही पालकांची जबाबदारी आहे, याकडे पालकच दुर्लक्ष करतात. अपघात वा दुर्दैवी घटना घडल्यास प्रशासन, पोलिसांकडे अंगुलिनिर्देश मात्र केले जातात.

Tripal Seat Travalling News
Nashik Crime News : ऍसिड हल्ल्यातील जखमी तरुणाचा मृत्यू; खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

पालकांनो हे कराच

* पाल्याला वाहन देत असाल तर नियमांचे पालन करण्यास सांगा

* मर्यादित वेगात वाहन चालवा

* हेल्मेटचा वापर सक्तीने करण्यास सांगा

* डबलसीटचाच वापर करा

* पाल्यांवर लक्ष ठेवा

पोलिसांनी केले पाहिजे

* हेल्मेट सक्ती कराच

* विनाहेल्मेट सर्वच दुचाकीस्वारांवर कारवाई

* जनजागृतीपर उपक्रम राबवावे

* शाळा-महाविद्यालयांमध्ये हेल्मेट सक्ती

* विद्यार्थी असेल तर वाहनपरवाना तपासावा

* दंडाऐवजी पालकांना द्यावी

Tripal Seat Travalling News
Solapur Highway Traffic : सोलापूर महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी, स्थानिक वाहनचालकांचा संताप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.