Nashik | त्रिपुरारी पौर्णिमा दीपोत्सव : लक्ष दिव्यांनी उजळला रामतीर्थ परिसर

The locality lit up with lamp festival on the occasion of Tripurari Purnima.
The locality lit up with lamp festival on the occasion of Tripurari Purnima.esakal
Updated on

नाशिक : त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधत सोमवारी (ता. ७) रामतीर्थ परिसर भाविकांनी लावलेल्या लाखो दिव्यांनी उजाळून गेला होता. श्री काळाराम मंदिराच्या आवारातही आकर्षक विद्युत रोषणाईसह देवस्थानतर्फे लावण्यात आलेल्या हजारो दिव्यांनी झगमगून गेला होता. लहान- मोठ्या मंदिरांतही विद्युत रोषणाईसह दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भाविकांनी रामतीर्थावर दीपोत्सव साजरा केला. मोठ्या संख्येने आलेल्या महिलांनी रामतीर्थ परिसरात लावलेल्या दिव्यांनी परिसर तेजोमय बनला होता. महाआरती व त्यानंतर लावण्यात आलेल्या हजारो दिव्यांनी रामतीर्थावर जणू चैतन्य अवतरले होते. यात्रेकरूंसह नाशिककर मोठ्या संख्येने या ठिकाणी आल्याने परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. गांधी तलाव परिसरातही मोठी गर्दी उसळली होती. याठिकाणी लावण्यात आलेल्या खाद्य पदार्थ्यांच्या स्टॉल्सवर खवैय्यांनी मोठी गर्दी केली होती. (Tripurari Purnima Deepotsavam Rama Teertha premises lit up with lamps Nashik Latest Marathi News)

श्री काळाराम मंदिरात मोठा उत्साह

श्री काळाराम मंदिरात हजारो पणत्या लावल्याने परिसर उजाळून गेला होता. देवस्थानचे विश्‍वस्त धनंजय पुजारी, मंदार जानोरकर यांच्या पुढाकारातून झालेल्या या दीपोत्सवासाठी श्रीरामभक्त संपत धात्रक यांच्यातर्फे पणत्यांची तर प्रवीण भाटे यांच्यातर्फे तेलाची व्यवस्था करण्यात आली होती. या वेळी मुख्य मंदिरावर करण्यात आलेल्या रोषणाईसह हजारो दिव्यांनी दीपोत्सव साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमप्रसंगी मंदिराच्या आवारातील विद्युत दिवे बंद करण्यात आल्याने वातावरणात दक्षिणेतील मंदिरांप्रमाणे वेगळी अनुभूती अनेकांनी मोबाईलमध्ये टिपली. दीपोत्सवासाठी श्रीरामभक्तांसह कर्मचारी वर्गाने मोठे सहकार्य केल्याचे श्री. पुजारी व जानोरकर यांनी सांगितले.

The locality lit up with lamp festival on the occasion of Tripurari Purnima.
High Blood Pressure in women : उच्च रक्‍तदाब ठरतोय महिलांचा शत्रू

कपालेश्‍वरी मोठी गर्दी

त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधत श्री कपालेश्‍वर महादेव मंदिरातही दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य मंदिर व आवारात मोठ्या प्रमाणावर दिवे लावण्यात आल्याने वातावरणात प्रसन्नता आली होती. देवदिवाळी व हरिहर भेट महोत्सवामुळे आज भाविकांना अर्धनारी नटेश्‍वराचे मोहक दर्शन झाले. गंगाघाटावरील मुक्तेश्‍वर महादेवाच्या दर्शनासाठी व दिवे लावण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती.

सिंधी पंचायतीतर्फे दहा हजार पणत्या

श्री संत बाबा उदासी ट्रस्ट व सिंधी पंचायतीतर्फे रामतीर्थालगत दहा हजार पणत्या लावत देवदिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी सिंधी बांधव कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सिंधी बांधवांकडून बाबा झुलेलाल यांचा मोठा जयजयकार करण्यात आला. कार्यक्रमाचे हे दुसरे वर्ष असल्याचे डॉ. विजय सत्पाल यांनी सांगितले.

The locality lit up with lamp festival on the occasion of Tripurari Purnima.
Nashik : रामकुंड नव्हे...रामतीर्थ!; ब्रह्महत्या पापमुक्तीसाठी ‘रामतीर्थ’चा दाखला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.